सातारा

'महावितरण'कडून 48 कंत्राटी कामगार कमी; वडूज विभागीय कार्यालयाच्या कारवाईने कर्मचाऱ्यांवर संकट

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : वडूज येथील विभागीय कार्यालयातील विद्युत वितरण विभागाच्या 48 कर्मचाऱ्यांना शनिवारी अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले आहे. अचानकपणे कामावरून कमी केल्याने कर्मच्याऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, तसेच कामगार कमी झाल्याने माण-खटाव तालुक्‍यांतील वीज वितरणावर परिणाम झाला आहे. 

बाह्य स्त्रोताच्या माध्यमातून "महावितरण'ने तब्बल 70 ते 80 टक्के कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कायम कर्मचाऱ्यांपेक्षा या कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे केली जातात. अनेक कामगार हे दहा ते 15 वर्षे हे काम करत आहेत. मात्र, शनिवारी अचानक या कामगारांना कामावरून कमी केल्याचे सांगण्यात आले. कामगार असण्यासाठी दोन वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण असण्याची अट "महावितरण'ने घातली आहे. त्यामुळे ज्यांचा आयटीआय कोर्स पूर्ण नाही त्यांना कामावरून काढण्यात आल्याची माहिती "महावितरण'च्या अधिकारी, तसेच ठेकेदारांनी दिली. तशी नोटीस या 48 कामगारांना देऊन कामावर येऊ नये असेदेखील सांगण्यात आले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे "महावितरण'च्या कारभारावर परिणाम झाला आहे. सदर प्रकाराबद्दल या कामगारांनी दहिवडी येथील "महावितरण'च्या कार्यालयासमोर आंदोलन केले. 

"काही सामाजिक व राजकीय संघटना आर्थिक फायद्यासाठी आमच्या मुळावर उठून उभ्या राहिलेल्या आहेत. मात्र, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की हे कर्मचारी आपल्या तालुक्‍यातील असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. कोरोना महामारी, अतिवृष्टीमध्ये आम्ही रात्रीचा दिवस करून सेवा दिल्याचादेखील "महावितरण'ने विचार करावा.'' 
- अमर भोसले, कंत्राटी कामगार 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Pune Crime: पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग अन् अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

SCROLL FOR NEXT