Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाड पालिकेत तब्बल नऊ वर्षांनी माजी मुख्यमंत्र्यांची एन्ट्री; चव्हाणांच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चा

migrator

कऱ्हाड (जि. सातारा) : तब्बल नऊ वर्षांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेत त्यांच्या निधीतून मिळालेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त प्रवेश केला. आमदार चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळी पालिकेत 2012 मध्ये ज्येष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर नऊ वर्षांनी त्यांनी पालिकेत उपस्थिती लावली. आमदार चव्हाण यांच्या पालिका प्रवेशाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

आमदार चव्हाण यांचा गट चार दिवसांपासून रुग्णवाहिकेवरून पालिकेत सक्रिय झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांच्या पालिकेतील उपस्थितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांच्यासह भाजप व लोकाशाहीचे सर्व नगरसेवक आमदार चव्हाण यांच्या स्वागताला उपस्थित होते. जनशक्ती आघाडीतील राजेंद्र यादव, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या गटाने कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. वास्तविक 2016 मध्ये पालिकेच्या निवडणुकीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या जाधव, यादव व उपाध्यक्ष पाटील यांच्या गटाने निवडणूक लढविली. "लोकशाही' व भाजप विरोधात होती. "जनशक्ती'ला बहुमत मिळाले. मात्र, निकालाच्या तिसऱ्याच दिवशी "जनशक्ती'ने फारकत घेतली. ती आजही कायम आहे. 

यादव व उपाध्यक्ष पाटील यांचा गट विधानसभा निवडणुकीत चव्हाणांपासून अधिक दुरावला. काही मोजकेच नगरसेवक चव्हाण यांच्यासोबत होते. त्यामुळे पालिकेतील राजकारणाने तेव्हापासून फिरकी घेतली. पालिकेला सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणचे देशपातळीवरील बक्षीस मिळाले. त्यावेळी चव्हाण यांनी पालिकेचे अभिनंदन केले. मात्र, पालिका अधिकारी किंवा सदस्यही त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांची ती दरी वाढली. आजच्या चव्हाणांच्या एन्ट्रीने नव्या राजकीय समीकरणांना निश्‍चित जन्म दिला आहे. विरोधी "लोकशाही'सह जाधव गट, भाजपनेही स्वागताला हजेरी लावली. त्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे. त्याशिवाय चव्हाण गटाकडून इच्छुकांचीही भाऊगर्दी पालिकेत झाली होती. तोही विषय विचार करायला लावणारा आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT