Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

कोरोना काळात साथ देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा : आमदार शिंदे

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : कोरोना महामारीने राज्यात थैमान घातले होते, तेव्हा करार पध्दतीने वैद्यकीय सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या कामावरून कमी करण्यात आले आहे. नवीन आरोग्य कर्मचारी भरती करताना अशा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. 

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत आमदार शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. शिंदे म्हणाले, ""कोरोना काळात आरोग्य विभागाची डॉक्‍टर्स, डाटा ऑपरेटर्स, परिचारिका अशी पदे करार पध्दतीने भरण्यात आली होती. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो कोरोना योद्‌ध्यांनी जीवाची पर्वा न करता त्या काळात वैद्यकीय सेवा देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर करार पध्दतीने भरती केलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आज त्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.'' 

आरोग्य विभागातील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय सेवा देताना मोठा ताण येत आहे. त्यामुळे या विभागातील रिक्तपदे त्वरित भरण्यात यावीत. ही पदे भरताना कोरोना काळात काम करणाऱ्या कारार पध्दतीने भरलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. भरती प्रक्रियेत त्यांना विशिष्ट गुण देण्यात यावेत. त्यांच्यासाठी राखीव कोटा ठेवण्यात यावा. अडचणीच्या काळात त्यांनी केलेल्या रुग्णसेवेला न्याय देण्यात यावा, असेही आमदार शिंदे यांनी सुचवले. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्र्यांनी करार पध्दतीने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT