सातारा

सातारा जिल्ह्यात रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात; कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

विकास जाधव

काशीळ (जि. सातारा) : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात 87.93 टक्के क्षेत्रावर पेरणी कामे उरकली आहेत. पिकांत सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. कांद्याचे दर समाधानकारक असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
 
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून, हरभरा आणि गहू पिकांची कामेही उरकत आली आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख 19 हजार 119 हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख 92 हजार 675 हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच 87.93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पिकांत सर्वाधिक रब्बी ज्वारीची लागवड झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 32 हजार 200 हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख 26 हजार 805 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र 30 हजार 498 हेक्‍टर असून, त्यापैकी 25 हजार 202 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र 12 हजार 177 हेक्‍टर असून, त्यापैकी दहा हजार 236 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गव्हाचे 34 हजार 973 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी 29 हजार 443 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्‍यात दमदार पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातही ऊस लागवड सुरू आहे. कांद्याचे दर सध्या समाधानकारक असल्याने जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. कांदा बियाणे व कांद्याच्या तरावाचे दर वाढले असले, तरी शेतकऱ्यांकडून कांदा लागवड केली जात आहे. 

तालुकानिहाय रब्बी पेरणी (हेक्‍टरमध्ये) 
सातारा- 17,293, जावळी- 7,334, पाटण- 10,710, कऱ्हाड- 13,025, कोरेगाव- 21,197, खटाव- 27,000, माण- 3,95,050, फलटण- 25,272, खंडाळा- 16,557, वाई- 14,349, महाबळेश्वर- 433. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हे देवेंद्रजींचं बेबी, अमृता फडणवीस यांचं विधान; '...तोपर्यंत पुण्याच्या फेऱ्या कमी करणार नाहीत'

Latest Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाहीय : सुप्रिया सुळे

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 37 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Nagpur : माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज विकताना अटक; बॉडी बिल्डिंगमध्ये चॅम्पियन अन् जिम ट्रेनर, भाजपशी कनेक्शन

Amazon Prime Day सेलचा शेवटचा दिवस; आयफोनसह 'या' 5 मोबईलवर मिळतोय 50% पेक्षा जास्त डिस्काउंट, ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT