jawali
jawali 
सातारा

पावसाचे आगार; पण पाऊस झाला पसार!

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : पावसाचा प्रमुख महिना समजल्या जाणाऱ्या व पावसाचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या जावळी तालुक्‍यात यंदा जुलै महिन्यातच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा जुलै महिन्यात 27 जुलैपर्यंत अवघ्या 31 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातच युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

जावळी तालुक्‍यातील मेढा, आनेवाडी, कुडाळ, बामणोली, केळघर, करहर या सहा मंडलांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सहा मंडलांमध्ये 144 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा अवघ्या 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून व जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस न पडल्याने शेती धोक्‍यात आली आहे. जावळी तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील भात शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी नेहमी पावसाकडे डोळे लावून असतात. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत असताना तालुक्‍यात युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. युरियाची वारंवार टंचाई जाणवू लागल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

जावळी तालुक्‍यात 96 टक्के पेरणी पूर्ण होत आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली. या तालुक्‍याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 19 हजार 923 हेक्‍टर इतके असून, 19 हजार 144 हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. भाताचे सर्वसाधारण क्षेत्र आठ हजार 947 हेक्‍टर इतके असून, आठ हजार 49 क्षेत्रावर भाताची पूर्ण लागवड झाली आहे. पावसाने दिलेली उघडीप व युरियाची टंचाई अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. मुंबईकर चाकरमानी गावाकडे आल्याने भातशेतीचे क्षेत्र वाढणार असून, पावसाने पाठ फिरवल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. 


जावळी तालुक्‍यातील युरिया टंचाईमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. 

- नामदेव जुनघरे, प्रगतशील शेतकरी, दिवदेववाडी 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT