patan 
सातारा

ढेबेवाडीत बाजार भरवतंय तरी कोण?

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातार) : कोणतीही परवानगी आणि खबरदारी न घेता सलग दुसऱ्याही आठवड्यात येथे भरलेल्या आठवडा बाजाराबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणेने जबाबदारी झटकत "त्याच्याशी आमचा काही संबंध नाही,' अशीच भूमिका घेतल्याने येथे बाजार भरवतंय तरी कोण..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडलेली गावे कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि गाव लवकर कोरोनामुक्त व्हावे म्हणून स्वतःला शिस्तीत बांधून जेवढी काळजी घेत आहेत तेवढी काळजी परिसरात तब्बल 38 रुग्ण सापडूनही ढेबेवाडीकरांनी घेतलेली दिसत नाही. दररोज आजूबाजूच्या गावातील लोकांचे लोंढेच्या लोंढे येथील बाजारपेठेत धावत आहेत. ध्वनिक्षेपकावरून गर्दीला सूचना देता देता पोलिसांचा घसा बसायची वेळ आली असून, रस्ते, बॅंका व दुकानासमोरील गर्दी हटत नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत आहे. 

पाटण तालुक्‍यातील मोठ्या आठवडा बाजारांमध्ये समाविष्ट होणारा ढेबेवाडीचा आठवडा बाजार लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंदच होता. मात्र, गेल्या आठवड्यात परवानगी नसतानाही विक्रेत्यांनी अचानकपणे बाजार भरवून यंत्रणेची डोकेदुखी वाढवली. कालही (ता. 10) त्याचीच पुनरावृत्ती झाली. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासून विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटायला सुरुवात केली. विक्रेते सोशल डिस्टन्सिंगमध्ये बसलेले असले, तरी ग्राहक गर्दी करत पैशाच्या देवाणघेवाणीबरोबरच भाजीपाला व इतर वस्तू हाताळताना दिसत होते. 

सलग दोन आठवडे येथे भरलेल्या बाजाराच्या परवानगीबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणेने जबाबदारी झटकत त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, अशीच भूमिका घेतल्याने मग बाजार भरवतंय तरी कोण..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरपंच विजय विगावे म्हणाले, ""सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य दक्षतेबाबत ग्रामपंचायतीने कडक पवित्रा घेतलेला आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहोत.'' 


अशा पद्धतीने बाजार भरवता येणार नाही. आठवडा बाजार भरवल्याचे समजल्यानंतर संबंधितांशी बोलून आवश्‍यक सूचना दिल्या आहेत. 

- श्रीरंग तांबे, प्रांताधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT