Satara
Satara 
सातारा

एकला चलो रे...चे धोरण स्वीकारून श्रमदानातून "त्यांनी' काढले 241 सीसीटी बंधारे

सकाळ वृत्तसेवा

कलेढोण (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या लॉकडाउनमध्ये घरी बसण्यापेक्षा श्रमदानाचा पर्याय निवडत पाचवड (ता. खटाव) येथील सामाजिक कार्येकर्ते माणिक घाडगे महाराज यांनी गावाजवळ डोंगरउतारावर सुमारे 241 सीसीटी बंधारे काढले आहेत. एकला चलो रे...चे धोरण स्वीकारून उभारलेल्या या बंधाऱ्यांत जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे पाणी साठल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

दुष्काळाशी सामना करताना पाचवडकर ग्रामस्थांनी दोन वर्षांत जलसंधारणाची पोकलॅन व जेसीबीच्या मदतीने कामे केली आहेत. त्यात डोंगरमाथ्यापासून ते पायथ्यापर्यंत पाणी अडविण्यासाठी विविध कामे केली आहेत. त्याचा फायदा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असून, जलसंधारणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटले आहे. दरम्यान, कालांतराने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा भराव आणि डागडुजीसाठी श्री. घाडगे महाराज यांनी पुढाकार घेतला. पाणी अडविण्यासाठी स्वत: पुढाकार घेत सकाळपासून हातात टिकाव, फावडे घेत सीसीटी बंधाऱ्यांची कामे केली.

देशामध्ये लागू झालेल्या लॉकडाउनच्या काळात त्यांनी 241 सीसीटी बंधारे तयार केले. त्यासाठी सुमारे दीड ते दोन मीटर लांब, दीड ते दोन फूट रुंद व एक ते दोन फूट खोलीचे खड्डे घेतले. गावाजवळचा भवानीमातेचा डोंगर आणि डोंगरउतारावर झाडांना पाणी मिळण्यासाठी हे खड्डे उपयुक्त ठरत आहेत. त्यांच्या या श्रमदानामुळे सुमारे तीन लाख लिटर पाणी साठून राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
श्री. घाडगे यांनी 2016 मध्ये बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या दरवाजावर 56 ठेक्‍यांत माती भरून मोकळ्या जागेत टाकल्यामुळे बंधाऱ्यामध्ये तीन दशकानंतर पाणी बघायला मिळत असून, त्यासाठी त्यांना 1350 रुपये खर्च आला. त्यानंतर 2018 मध्ये गावाने जलसंधारणाच्या कामात आघाडी घेत गावातील ओढे-नाले खोलीकरण केल्याने आज गावठाणात पाणी उपलब्ध झाले आहे. जलसंधारणाच्या या कामामुळे कायम दुष्काळी भागात म्हणून गणल्या जाणाऱ्या पाचवडकरांना यावर्षीचा पाण्याचा दुष्काळ सुसह्य झाला. सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या श्री. घाडगे यांच्या कामांना ग्रामस्थांचे बळ मिळत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


""लॉकडाउनमध्ये घरी बसण्यापेक्षा श्रमदानाचा पर्याय निवडला. एकला चलो रे...चे धोरण स्वीकारून 241 सीसीटी बंधारे तयार केले. जून महिन्याच्या सुरवातीलाच झालेल्या पावसामुळे त्यात पाणी साठल्याने खूप आनंद झाला.'' 

-माणिक महाराज, सामाजिक कार्येकर्ते, पाचवड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT