Maharashtra Police
Maharashtra Police esakal
सातारा

Covid 19 Effect : महाबळेश्वर पोलिस ठाणे सांभाळावे लागणार निरीक्षकांनाच

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : येथील नगरपालिकेपाठोपाठ आता पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील पोलिस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाची लागण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आता सात झाली आहे. दरम्यान, ठाण्यातील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी दिली.

तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शहराला कोरोनाचा विळखा अधिक घट होताना दिसत आहे. शहरात विनाकारण फिरणारे कमी झाले असले, तरी बंद झाले नाहीत. त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांसाठी पालिका, महसूल व पोलिस विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोनाबरोबर युद्ध करीत आहेत. नागरिकांच्या संपर्कात आल्याने मागील आठवड्यात पालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ दोन पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते.

कोरोना तपासणी अहवालानुसार पोलिस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आता सात झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पोलिस विभागातून चिंता व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस ठाण्यातील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी दिली.

दरम्यान, मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षक कांडुभैरी हे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शनिवारी अशाच मोकाट फिरणारे 11 बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. लॉकडाउनचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT