सातारा

येरवडा कारागृहातून येताच चार पोलिसांसह 13 जणांना व्हावे लागले क्वॉरंटाइन

हेमंत पवार

कऱ्हाड : गुन्ह्यातील एका संशयिताला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी येरवडा कारागृहातून कऱ्हाडला आणले होते. त्याची चौकशी झाल्यानंतर त्याला पुन्हा येरवडा कारागृहात नेऊन सोडण्यात आले. संबंधित संशयिताची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित चार पोलिस कर्मचारी, गार्ड अशा 13 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. मात्र, यामुळे आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर तीन दिवस राहणार बंद

येरवडा कारागृहातून गुन्ह्यातील एका संशयिताला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन येथे आणले होते. त्याच्याकडे चौकशी करून त्या संशयिताला पुन्हा येरवडा कारागृहात नेऊन सोडण्यात आले. त्यानंतर तेथे संशयिताची कोरोनाची तपासणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे चार कर्मचारी, गार्ड व अन्य अशा 13 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. संबंधितांना कृषी महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात विशेष पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

केशरी कार्डधारकांसाठी शासनाने घेतला 'हा' निर्णय 

त्यांच्या गाडीत काेयता, विळा, दांडकी हाेती....त्यांनी तयारी केली....अन् पुढे काय झाले वाचा 

दरम्यान, त्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली असून, सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. संशयिताला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतल्यापासून पुन्हा तेथे सोडेपर्यंत पोलिसांनी व त्यांच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली होती. त्यामुळे संबंधितांचे अहवाल निगेटिव्ह येतील, असा विश्वास पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT