सातारा

'त्या' दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ तांबवेकरांनी पाळला "बंद'

अनिल बाबर

तांबवे (जि.सातारा) ः गावात घडलेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून आज (साेमवार) गाव बंद ठेवण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला होता. त्याला गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आज दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन प्रतिसाद दिला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत झाला.
युवक कॉंग्रेसचे साताऱ्यात आंदोलन
 
गावामध्ये मागील आठवड्यात दुर्दैवाने एक घटना घडली. यामुळे संपूर्ण गाव हादरले असून, या घटनेचा निषेध म्हणून गावातील युवकांना एकत्र येऊन आज तांबवे बंदची हाक दिली होती. त्या अंतर्गत गावातील सर्व व्यवहार, दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय गावातील युवकांनी घेतला होता.

चौपदरीकरणाच्या कामात गावांच्या नावाच बारस 

गावातील काही जण खोट्या अफवा पसरवत आहेत, त्यांना पायबंद घालून समज द्यावी, संबंधित पीडित कुटुंबातील युवतीला न्याय मिळावा आणि संशयिताला कठोर शिक्षा व्हावा, अशी मागणी करून त्यासाठी गाव एक दिवस बंद ठेवण्याचा निर्धार युवकांनी केला होता. त्यासंदर्भातील निवेदन कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना युवकांच्या वतीने देण्यात आले होते.

'या' पर्यटनस्थळी निसर्ग खुलला; पण पर्यटकांविना सुना-सुना

आज पुकारण्यात आलेल्या बंदला गावातील व्यापारी, ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्वांनी संयमाने त्याला पाठिंबा दिल्याने बंद शांततेत झाला.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT