सातारा

ग्राहक प्रबोधन समितीचा दणका; निढळचे क्रशर, आरएमसी प्लॅन्ट सील

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा)  : माण तालुक्‍यातील खडी क्रशरवर कारवाई होताना खटाव तालुक्‍यातील निढळ येथील खडी क्रशर व आरएमसी प्लॅन्ट राजरोस सुरू होता. मात्र, उशिरा का होईना महसूल विभागाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संबंधित क्रशर व प्लॅन्ट सील केला आहे. ग्राहक प्रबोधन समितीच्या आंदोलनाला या कारवाईमुळे यश आले आहे. 

ग्राहक प्रबोधन समितीने या क्रशरबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यांनी म्हटले होते, निढळ (ता. खटाव) येथे सातारा-पंढरपूर महामार्गालगत उभारण्यात आलेला खडी क्रेशर व आरएमसी प्लॅन्ट हे अनधिकृत आहे. त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये फार मोठा घोटाळा आढळून आलेला आहे. तसेच या ठिकाणी लाखो ब्रास खडी व वाळू तयार करण्यात आली आहे. त्याचा साठा कशा प्रकारे करण्यात आला आहे, याची नोंद महसूल विभागात मागवलेल्या माहितीमध्ये कुठेही आढळून आलेली नाही. त्याबद्दल या बोगस प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीसुध्दा ग्राहक प्रबोधन समितीचे माण-खटाव अध्यक्ष राजू मुळीक यांनी केली होती. 

पाकिस्तानी क्रेडिट कार्ड प्रकरणानंतर प्रताप सरनाईकांनी कंगनाविरोधात आणि बदनामी करणाऱ्या माध्यमांविरोधात दाखल केला हक्कभंग

संबंधित ठेकेदार महसूल विभागाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत असून, या क्रशरवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत श्री. मुळीक यांनी उपविभागीय कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण केले होते. खटावच्या तहसीलदारांनी तातडीने लक्ष देऊन क्रशरवर कारवाई करण्याची मागणीसुध्दा केली होती. प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना क्रशरवर कारवाईचे आदेश दिले होते. तरीही तो खडी क्रशर सुरू होता. तत्कालीन तहसीलदार अर्चना पाटील यांनी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, नवीन तहसीलदार किरण जमदाडे यांनी धडाकेबाज पाऊल उचलत क्रशरवर कारवाई केली.

चेला कारखान्याचा चेअरमन असल्याने हिंदकेसरी खंचनाळे अजिंक्यता-यावर नेहमी यायचे

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT