ehenol
ehenol sakal
सातारा

आशियातील मोठा प्रकल्प ‘स्वराज’मध्ये होणार

सकाळ वृत्तसेवा

फलटण : उसाचा रस(sugar juice) आणि बायोसिरपवर (biosyrup)आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प(ethenol project) फलटणमध्ये उभारणार असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड क्यूएल लिमिटेडने केली आहे.उपळवे (ता. फलटण) येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रतिदिन ५०० व दुसऱ्या टप्प्यात १,१०० किलोलिटरपर्यंत वाढवली जाणार असून, त्यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

आशिया खंडात सध्या सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे. तेथील गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड कंपनीकडून प्रतिदिन ६०० किलोलिटर इथेनॉल उत्पादन केले जात आहे. फलटणमधील प्रकल्पाची क्षमता त्यापेक्षा अधिक असणार आहे. ‘स्वराज’ने प्राईज इंडिया लिमिटेडसोबत तंत्रज्ञान भागीदारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या स्वराजला भारतातील सर्वांत प्रगतशील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनापैकी एक म्हणून ओळखले जाते. स्वराजने आधीच प्रतिदिन ६० किलोलिटर क्षमतेचा मोलॅसिस आधारित हा प्रकल्प उभारला आहे.

स्वराज आणि प्राईज यांचा विस्तारित प्रकल्प २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. प्राईजकडे प्रकल्प आराखडा, अभियांत्रिकी, पुरवठा आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जबाबदारी असेल. उसाचा रस आणि बोयोसिरप या इथेनॉलनिर्मितीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पांमध्ये केला जाईल. प्राईजच्या उसाच्या रसावर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर बोयोसिरपमध्ये करण्याच्या अभिनव तंत्रज्ञानामुळे स्वराजला वर्षभर इथेनॉल उत्पादन सुरू ठेवण्यास मदत होईल.

प्राईजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी ‘स्वराज’ नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास तयार असतात. हा प्रकल्प भारत सरकारच्या(government of india) मिश्रणाच्या धोरणाची पूर्तता करण्याच्या दिशेने पडलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. केंद्र सरकारने आखलेल्या इथेनॉल मिश्रण(eThenol) कार्यक्रमाशी या प्रकल्पाच्या आधारे जोडले जात आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT