Encroachment
Encroachment esakal
सातारा

धोंडेवाडीतील अतिक्रमणांवर वन विभागाचा 'हातोडा'; हाॅटेल, घरं जमीनदोस्त

आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : वनविभागाने धोंडेवाडी (ता. खटाव) येथील वनविभागाच्या (Forest Department) जागेतील धाब्यासह इतर अतिक्रमणे (Encroachment) काढली. याबाबतची अधिक माहिती अशी, दहविडी वनक्षेत्रातील मायणी परिमंडळ अंतर्गत धोंडेवाडी वन 836 गट नंबर 50 मध्ये अतिक्रमण असलेल्या क्षेत्रावर वन गुन्हा नोंद केला होता. या क्षेत्रावर 0.30 हेक्‍टर क्षेत्रात अतिक्रमण केलेले होते. (The Forest Department Removed The Encroachment Between Dhondewadi Village Satara News)

वनविभागाने धोंडेवाडी (ता. खटाव) येथील वनविभागाच्या जागेतील धाब्यासह इतर अतिक्रमणे काढली.

अतिक्रमणधारक धोंडीराम नाथा मासाळ यांनी या जागेवर पक्‍क्‍या धाब्याचे बांधकाम केले होते, तसेच अन्य तीन जणांनी जनावरांचा गोठा आणि पक्की शेतजमीन तयार करून अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्याचे आदेश उपवनसंरक्षक यांनी दिल्यानंतर काल वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, वनसर्वेक्षक म. हू. शेख यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी वनजमिनीवरील पक्‍क्‍या ढाब्याचे बांधकाम, शेती व गोठा अशी सर्व अतिक्रमणे काढली. त्यानंतर वनक्षेत्राच्या हद्दी आखून 0.30 हेक्‍टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते (M. N. Mohite) व सहायक वनसंरक्षक एस. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

'टाळी एका हातांनी वाजत नाही, त्यासाठी दोन्ही हातांची गरज'; 'कृष्णा'त मनोमिलन शक्य?

The Forest Department Removed The Encroachment Between Dhondewadi Village Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT