सातारा

महामार्गालगतच्या बॅटरी दुकानांत चोरट्यांचा धूडगूस; तब्बल 28 बॅटरी पळवल्या

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : येथील महामार्गालगतच्या बॅटरी दुकान फोडून चोरट्यांनी नव्या व जुन्या अशा सुमारे 50 हजार रुपये किमतीच्या 28 बॅटरी चोरल्या. सोमवारी रात्री उशिरा घटना घडली असून, काल सकाळी उघडकीस आली. रहदारीच्या ठिकाणचे दुकान फोडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, महामार्गालगत पेट्रोल पंपाशेजारी सुपेरिअर बॅटरीच्या विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. मूळचे केरळ मात्र व्यवसायासाठी येथे स्थायिक असलेले जॉय अण्णा यांनी रात्री दुकान नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. सकाळी त्यांना दुकान उघडण्यापूर्वीच चोरट्यांनी ते फोडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर जॉय अण्णा यांनी पोलिसात धाव घेतली. तेथे चोरीची माहिती दिली. 

पहाटे बंद दुकानाचे कुलूप कटरने तोडून चोरटे दुकानात शिरले असावेत, असा अंदाज आहे. दुकानातील एक्‍साइड, एसएसएफ, फ्रीडम कंपनीच्या नवीन आणि दुरुस्तीला ठेवलेल्या बॅटऱ्यासहीत नादुरुस्त अशा 28 बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुपेरियर बॅटरीचे दुकान पेट्रोल पंपानजीक सेवा रस्त्यालगत आहे. येथे 24 तास रहदारी असते, तरीही चोरट्यांनी हे दुकान फोडून तब्बल 28 बॅटरी चोरून नेण्याचे धाडस केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT