सातारा

आबालवृद्धांच्या मदतीसाठी टाइम बॅंक

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : आबालवृद्धांना अनेकदा मदत लागते. त्या गरजेवेळी कोणी सापडेल, याची खात्री नसते. अशा गरजेच्यावेळी साह्यासाठी, मदतीसाठी आपल्या फावल्या वेळेचा उपयोग होऊन गरजवंताची गरज पूर्ण व्हावी यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कऱ्हाडमध्ये ‘टाइम बँक’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्याचा आज सर्व जाती धर्मातील आबालवृद्धांसाठी जागतिक मानवाधिकारदिनी प्रारंभ करण्यात आला.

नोकरी, व्यवसाय, बदलती जीवनशैली, स्पर्धा, विभक्त कुटुंब पध्दती यामुळे कुटुंबे छोटी झाली आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे कामातून वेळ नसतो. मात्र, काढला तर वेळ असतोच, हेही तितकेच खरे आहे. अलीकडे आलेल्या बदलामुळे मी आणि माझे कुटुंब ही संकल्पना बऱ्यापैकी रुजत आहे. त्यामुळे मला समाजाचे काहीही देणे-घेणे नाही, असेही म्हणणारे अनेक मंडळी असतात. तर समाजासाठी अहोरात्र झटणारेही असतात. एकमेकांना साह्य केले तरच आपण पुढे जाऊ शकतो, हेही वास्तव आहे. कुणाचा एकटेपणा, कुणाची साथसंगत, कुणाचे तरी बालपण, तर कुणाचे म्हातारपण अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या पैशाने पुऱ्या होत नाहीत. त्याला भावनेची जोड द्यावी लागते.

ज्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत, अशा भावनिक, आवश्यक सेवा टाइम बँकेच्या माध्यमातून मिळण्याची व्यवस्था होण्यासाठी अमेरिका, चीन, रशिया, आफ्रिका आदी ३० देशांमध्ये वेगवेगळ्या टाइम बँका सुरू झाल्या. त्यांच्या जवळपास ५०० शाखा कार्यरत आहेत. लाखो लोक या बँकांचे लाभार्थी आहेत. भारतातील मध्यप्रदेशमध्ये २०१६ मध्ये पहिल्या टाइम बँकेची सुरुवात झाली आहे. पण, पश्चिम महाराष्ट्रात ही संकल्पना सुरू झालेली नव्हती. त्यासाठी येथील डॉ. धनंजय खैर यांनी पुढाकार घेऊन त्यासाठी स्वतः समन्वयक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या माध्यमातून ही टाइम बॅंक आकारास येत असून, ज्यांनी मदत केली, त्यांच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. गरजेवेळी मिळणारी मदत ही मोफत मिळणार आहे. त्यातून गरजवंताचे काम होऊन त्यालाही साह्य मिळून त्याचे काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ही फार आवश्यक बाब ठरणार आहे.

काय आहे टाइम बॅंक?

टाइम बँक ही अशी एक संकल्पना आहे की, तुम्ही तुमच्या दिवसभरातील ‘फावला वेळ’ ज्यांना गरज आहे, अशा ‘गरजवंताला’ द्यायचा. तुम्ही जेवढा वेळ दुसऱ्या‍ला त्याच्या कामासाठी द्याल, तेवढा कालावधी टाइम बँकेत तुमच्या खात्यावर जमा होईल. हा ‘समय संचय’ तुम्हाला तुमच्या गरजेवेळी त्या टाइम बॅंकेकडून दिला जाईल. त्यासाठी कोणी किती वेळ दुसऱ्यांच्या मदतीसाठी खर्च केला आहे, त्याचे एक रजिस्टर ठेवले जाणार आहे.

कुणाकडे फावला वेळ असतो, तर कुणाकडे आपल्या अत्यावश्यक कामासाठीही वेळ नसतो. आपल्या आयुष्यातील काही काळ कुणाला तरी मदत व्हावी असे कुणाला वाटत असते, तर आपल्या पडत्या काळात कुणीतरी आपणाला वेळ द्यावा, अशी कुणाची अपेक्षा असते. अशा दोन्ही गटांतील लोकांना टाइम बँकेची मदत होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी या बॅंकेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे.

- डॉ. धनंजय खैर,

समन्वयक, टाइम बॅंक, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT