सातारा

साताऱ्यातील पोलिसांनी कोर्टी, उत्तर प्रदेशातील युवकांना चोरीच्या प्रकरणात पकडले

प्रवीण जाधव

सातारा : शहर हद्दीमध्ये घडलेल्या जबरी चोरी व चिकन सेंटरमधील पैसे चोरून नेल्याचे दोन गुन्हे शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी विजय ऊर्फ सावळा बाबा जावळे (रा. गणेशनगर, कोर्टी, ता. कऱ्हाड) याला शेंद्रे येथे महामार्गावर पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले, तर चिकन सेंटरमधील पैसे चोरल्याप्रकरणी सादिक शहीद सिद्दिकी (मूळ रा. तुलसीपूर, जि. बळरामपूर, उत्तर प्रदेश) याला महाबळेश्‍वर येथून अटक केली आहे.
 
काल मनाली हॉटेलसमोरून भाजी खरेदी करून जाताना दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने एकाच्या शर्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून लंपास केला होता. हा गुन्हा उंब्रज परिसरातील विजय जावळे यांनी केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना मिळाली. त्यांनी त्याची माहिती काढली. त्यामध्ये मोबाईलची तांत्रिक माहितीनुसार त्याला शेंद्रे (ता. सातारा) येथे पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

घाबरू नका! कोरोनावरील लशीमुळे एड्‌स होत नाही; ऑक्‍सफर्डचा दावा

त्याचप्रमाणे शुक्रवारी (ता. 11) शहरातील नॅशनल चिकन सेंटरमधून कामगाराने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्यातील संशयित सादिक सिद्दिकी याला महाबळेश्‍वर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीतील फोन जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवलदार प्रशांत शेवाळे, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, संतोष कचरे, गणेश घाडगे, अभय साबळे, गणेश भोंग, विशाल धुमाळ हे या कारवाईत सहभागी होते.

ग्राहक प्रबोधन समितीचा दणका; निढळचे क्रशर, आरएमसी प्लॅन्ट सील

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : लग्नाच्या आमिषाने तरुणीला रिसॉर्टवर नेलं, पीडिता तीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्..., कोल्हापुरातील घटनेने खळबळ

धक्कादायक! 'रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू'; डॉ. देगावकरविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur Crime: 'हरियानातून आलेला चोरटा जेरबंद'; एसटी स्टॅण्डवरून चोरला होता पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज

Latest Maharashtra News Updates : उद्घाटनाआधीच उड्डाण पुलात खड्डे; नागपुरात सार्वजनिक बांधकामावर प्रश्नचिन्ह

Hadapsar Traffic : हडपसरमध्ये आजारापेक्षा उपचार भयंकर; मगरपट्टा पुलाखालील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचे नियोजन फसले

SCROLL FOR NEXT