सातारा

जम्बो हॉस्पिटलचे दरवाजे लवकर उघडा; सातारकरांची अपेक्षा

उमेश बांबरे

सातारा : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या जम्बो हॉस्पिटल सुरू होण्याच्या तारखा पुढे जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना बेडची खूप अत्यावश्‍यकता होती. त्यावेळी प्रशासनाकडून जम्बो हॉस्पिटलच्या टेंडरची प्रक्रिया व साधनसामुग्री जमा करण्याचे काम सुरू होते. आता घाईगडबडीने नऊ टेंडरची पूर्तता केल्यानंतर जम्बो हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आले आहे. काही इक्विपमेंट जोडण्याचे बाकी असल्याने आणखी चार ते पाच दिवसांनंतर हे रुग्णालय सातारकरांच्या सेवेत दाखल होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. कोरोना रुग्णांची गरज संपल्यानंतर हॉस्पिटल सुरू करण्यात प्रशासनाला काय आनंद, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

सप्टेंबर महिन्यात साताऱ्यात कोरोना संसर्गाने सर्व उच्चांक मोडले. मृत्यूदरात देशात तिसरा तर बाधितांच्या आकडेवारीमध्ये देशात नवव्या क्रमांकावर सातारा जिल्ह्याची नोंद झाली. या महिनाभराच्या कालावधीत सर्वाधिक त्रास झाला, तो बाधित रुग्णांना. वेळेवर उपचारासाठी बेड उपलब्ध होऊ न शकल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. तर काहींना साधा ऑक्‍सिजन बेडही उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी धाप लागून जीव गमावण्याची काहींवर वेळ आली. कोणत्याही रुग्णालयात दूरध्वनी केला तर सर्व बेड फुल्ल आहेत, असेच सांगितले जात होते. दुसरीकडे जिल्हा प्रशासन जम्बो हॉस्पिटलच्या उभारणीत व्यस्त होते. त्यासाठी तब्बल नऊ प्रकारची टेंडर काढण्यात आली. या प्रकियेला महिना गेल्यामुळे सप्टेंबरमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल झाले. आता जम्बो रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रुग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. तर दुसरीकडे "डॅशबोर्ड'ची सुविधा उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, याची माहिती तातडीने मिळू शकत आहे.

रेशनवर गव्हाऐवजी मका देवून शासनाकडून गरिबांची थट्टा
 
आता कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी केल्यामुळे विविध रुग्णालयांतही बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. तेथे मात्र, रुग्णांचा खिसाच कापला जात आहे. सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार परवडणारा नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटल मोठा आधार ठरणार आहे. आता खासगी रुग्णालयांतही बेड उपलब्ध होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयावर पडणारा ताणही कमी झाला आहे. अशा परिस्थितीत वेळेत जम्बो हॉस्पिटलचा उपक्रम हाती घेतला असता तर सप्टेंबरमध्ये झालेले रुग्णांचे हाल व मृत्यूचे प्रमाण अल्प राहिले असते.

प्रवास होणार सुखकर! सातारा-लोणंद मार्गासाठी तब्बल २३ कोटींचा निधी
 
मात्र, शासन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात जम्बो हॉस्पिटलची टेंडरप्रक्रिया सुरू होती. आता या हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात असून, काही इक्विपमेंट बसविण्याचे काम बाकी आहे. तेही येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होऊन हे सुसज्ज जम्बो हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल होईल. येथे पूर्णपणे मोफत उपचार होणार आहेत. पण, आता उद्‌घाटनाचा मुहूर्त पाहण्याऐवजी सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी तरी जम्बोचे दरवाजे उघडावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

आमिर खानने शेअर केला व्हिडिओ, पाणी फाऊंडेशनमुळे साता-यातील गावात नापीक जमिनीचं झालं जंगलात रुपांतर 
 

  • जम्बो हॉस्पिटलमधील बेड... 
  • आयसीयू बेड  52
  •  
  • ऑक्‍सिजन बेड  200
  •  
  • सर्वसाधारण बेड  50
  •  
  • एकूण बेड  300


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT