सातारा

थोडा प्रयत्न करू; पण पहिल्या पाचमध्ये येऊच : उपनगराध्यक्ष शिंदेंचा कानमंत्र

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहराला देशपातळीवर 25 वा, पश्‍चिम भारतात 11 वा, तर महाराष्ट्रामध्ये दहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. मलकापूर शहर हे पहिल्या पाचमध्ये येण्यासाठीचा "अजून थोडा प्रयत्न करू, पहिल्या पाच मध्येच येऊ' हा कानमंत्र पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नागरिकांना दिला. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पालिकेच्या वतीने प्रभागनिहाय प्रबोधनपर बैठकांच्या प्रारंभप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. नागरिकांनी केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण, घरगुती कचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, शहर स्वच्छता उपक्रमात सहभागातून सर्वेक्षणात पहिल्या पाचमध्ये येण्याचा मनोदय बाळगला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शहरी व नागरी कार्य मंत्रालयाकडून स्वच्छ सर्वेक्षण व शहर स्वच्छतेबाबत फोनवरून नागरिकांना सात प्रश्न विचारून त्याचा प्रतिसाद नोंदविला जाणार आहे. या प्रश्नांची उजळणी व पालिकेमार्फत केले जाणारे घनकचरा व्यवस्थापन आणि राबविले जाणाऱ्या स्वच्छता अभियानाबाबतची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता पालिकेने प्रभागनिहाय प्रबोधनपर बैठकीचे आयोजन केले आहे.

या वेळी नागरिकांना प्रश्नावली विचारली जाणार असून, त्याचा प्रतिसाद नोंदविणेबाबत चर्चा झाली. चर्चेमध्ये पालिकेमार्फत होत असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती, तसेच सांडपाणी प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी मार्गदर्शन केले. सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, नगरसेविका आनंदी शिंदे, नंदा भोसले, गीतांजली पाटील, कमल कुराडे, पूजा चव्हाण, माधुरी पवार, नुरजहान मुल्ला, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार उपस्थित होते. आनंदी शिंदे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT