Aadhar card can change your name and address follow this steps 
विज्ञान-तंत्र

आधार कार्डमध्ये चुटकीशीरपणे तुमचे नाव आणि पत्ता बदलू शकतो; सर्वात सोप्या टिप्स जाणून घ्या

सुस्मिता वडतिले

पुणे : तुम्ही आता आधार कार्डवर तुमचा मोबाइल नंबर अत्यंत सोप्या पद्धतीने बदलू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, आणि आता तुम्हालाही तो तुमच्या आधार कार्डमध्ये बदलायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सर्वात सोपा पद्धती सांगणार आहोत. आधार हा 12 अंकांचा युनीक आइडेंटिफिकेशन नंबर आहे जो भारत सरकारने जारी केला आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या बायोमेट्रिक माहितीवर आधारित आहे जसे की आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट आणि डीओबी आणि घराचा पत्ता इत्यादी लोकसंख्याशास्त्रीय माहितीवर आधारित आहे.

आधार अपडेट करणे केवळ फायदेशीरच नाही तर बर्‍याच ऑनलाइन सेवांसाठी देखील आवश्यक आहे. आधारशी संबंधित ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधी UIDAI (यूआयडीएआय) कडे नोंदवावा जो ओटीपीच्या माध्यमातून ओथेंटिकेशनसाठी वापरला जाईल. जर तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तुम्ही तुमच्या आधार कार्डवर दिलेला नंबर बदलू इच्छित असाल तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता.

ऑनलाइन आधारमध्ये तुमचा मोबाइल नंबर कसा बदलायचा

मोबाईल नंबर आधारवर ऑफलाइन बदलता येतो आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी यूआयडीएआयने ऑनलाइन पद्धत ठेवलेली नाही. तथापि, आपण यासाठी अर्ज ऑनलाइन डाउनलोड करू शकता आणि आपला काही वेळ वाचवू शकता. या कामासाठी तुमचा सुरु असलेला मोबाइल नंबर आधार कार्डवर रजिस्टर्ड केला जातो. 

मोबाइल नंबर दोनपद्धतीने आधारवर अपडेट करू शकता

  • १. ओटीपी द्वारे आधारवर मोबाइल नंबर अपडेट कसा करावा
  • सर्वप्रथम अधिकृत आधार पोर्टल https://ask.uidai.gov.in/ वर भेट द्या
  • तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चाच्या सहाय्याने लॉग इन करा. एकदा तुमचे  डिटेल्स भरल्यानंतर, ओटीपी पाठवा आणि क्लिक करा.
  • उजवीकडील बॉक्समध्ये ओटीपी पेस्ट करा आणि सबमिट ओटीपी क्लिक करून पुढे जा. मोबाइल आपल्याकडे ठेवा जेणेकरुन आपण त्वरित ओटीपीमध्ये एंटर करू शकाल.
  • पुढील पानावर तुम्हाला आधार सर्व्हिस नवीन नावनोंदणी व अपडेट आधार पर्याय दिसतील. तिथे अपडेट आधारवर क्लिक करा.
  • पुढील स्क्रीनवर आपल्याला नाव, आधार क्रमांक, रहिवासी प्रकार आणि अपडेट करू इच्छित असे पर्याय सापडतील.
  • आता येथे अनिवार्य पर्याय भरा आणि ‘what do you want to update’  सेक्शनवर मोबाइल नंबर निवडा.
  • पुढच्या पानावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा विचारला जाईल. सर्व फील्ड भरा आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा. प्राप्त केलेला ओटीपी एंटर करा आणि ते व्हेरिफाय  करा आणि नंतर सेव्ह आणि प्रॉसीड वर क्लिक करा.
  • सर्व डिटेलस दोनदा तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट आयडीसह सक्सेस स्क्रीन दिसेल. Book Appointment (बुक अपॉईंटमेंट) ऑप्शनवर क्लिक करा आणि आधार नोंदणी केंद्रावर स्लॉट बुक करा.

२. ओटीपीशिवाय आधारवर मोबाईल क्रमांक कसा अपडेट करावा

  • आधार एनरोलमेंट किंवा अपडेट सेंटर वर जावा.
  • आधार अपडेट फॉर्म भरा
  • फॉर्मवर मोबाइल नंबर लिहा 
  • तुम्हाला फॉर्मवर तुमचा जुना मोबाइल नंबर लिहिण्याची आवश्यकता नाही.
  • एक्ज़ेक्यूटिव तुमची रिक्वेस्ट रजिस्टर करेल 
  • तुम्हाला एकनोलेजमेंट स्लिप दिली जाईल ज्यावर यूआरएनअपडेट रिक्वेस्ट नंबर लिहिला जाईल.

या सर्व्हिससाठी 25 रुपये द्यावे लागतील

  • Step 1. यूआयडीएआय वेबसाइटवर जा आणि अ‍ॅड्रेस अपडेट रिक्वेस्ट (ऑनलाईन) वर क्लिक करा.
  • Step 2.  नवीन पेज उघडल्यानंतर, तळाशी असलेल्या PROCED (प्रोसीड) बटणावर टॅप करा.
  • Step 3. तुमचा आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा आणि त्यानंतर प्राप्त ओटीपी प्रविष्ट करा. (आपल्या आधार कार्डशी जोडलेल्या त्याच नंबरवर आपल्याला ओटीपी मिळेल).
  • Step 4. यानंतर तुम्ही पिन कोडद्वारे किंवा पत्त्याद्वारे आधार कार्डवरील पत्ता बदलू इच्छिता की नाही ते निवडावे लागेल.
  • Step 5. पुढील पृष्ठावर, आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • Step 6. आता तुम्हाला आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुमचा अचूक पत्ता पुरावा द्यावा लागेल. यासाठी पासपोर्ट, विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, टेलिफोन बिल (लँडलाईन), प्रॉपर्टी टॅक्स पावती इ. चा पुरावा निवडू शकता.
  • Step 7.  शेवटी तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोवाइडर निवडणे आवश्यक आहे. सर्विस प्रोवाइडर निवडण्यासाठी, सर्विस प्रोवाइडरच्या नावानंतर रेडिओ बटणावर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT