इस्रोच्या पहिल्या सौरमोहिमेचा एक मोठा टप्पा पार पडला आहे. 'आदित्य एल1' या उपग्रहाने सोलार फ्लेअर्सचे पहिले हाय एनर्जी एक्स-रे रेकॉर्ड केले आहे. इस्रोने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन याबाबत पोस्ट केली आहे. ही मोहीम आतापर्यंत अगदी ठरल्याप्रमाणे पार पडत असल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं आहे.
मंगळवारी इस्रोने याबाबत एक्स पोस्ट करत माहिती दिली. 29 ऑक्टोबरला आदित्य उपग्रहाचा पहिला ऑब्जर्वेशन पीरिएड पार पडला. यावेळी या उपग्रहावर असलेल्या हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्टोमीटर या उपकरणाने सोलार फ्लेअर्स, म्हणजेच सौर ज्वालांना रेकॉर्ड केले.
नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थेच्या जिओस्टेशनरी ऑपरेशनल एनव्हायरनमेंटल सॅटेलाईट (GOES) या उपग्रहाने दिलेल्या एक्स-रे लाईट कर्व्ह्जच्या डेटाशी सुसंगत असल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं आहे. (Tech News)
Aditya L1 ही भारताची पहिली सौरमोहीम आहे. यामध्ये आदित्य हा उपग्रह पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येणार आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. या ठिकाणाहून आदित्य हा सूर्याचा अभ्यास करणार आहे.
2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आदित्य उपग्रहाला लाँच करण्यात आलं होतं. यानंतर 19 सप्टेंबरला आदित्यने पृथ्वीची कक्षा सोडून लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. जानेवारी 2024 पर्यंत हा उपग्रह L1 पॉइंटपर्यंत पोहोचणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.