airtel introduces three new prepaid plans  airtel ipl bonanza offers marathi News Update
airtel introduces three new prepaid plans airtel ipl bonanza offers marathi News Update  
विज्ञान-तंत्र

Airtel Prepaid Plan : एअरटेलचा धमाका! IPL साठी लाँच केले तीन नवे प्लॅन्स; जाणून घ्या सविस्तर

रोहित कणसे

Airtel New Prepaid Plan : IPL 2024 ची आज सुरूवात होते असून पहिला सामना चैन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मोबाईल कंपन्यांनी नवीन प्लॅन्स लाँच केले जात आहेत. जिओच्या नंतर आता एअरटेलने नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत.

IPL Bonanza Offer

आयपीएल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून कंपनीने नवीन IPL Bonanza Offer लाँच करण्यात आल्या आहेत. या ऑफरमध्ये कंपन्यांनी तीन नवे प्रीपेड रीचार्ज प्लॅन्स दिले आहेत. हे सर्व प्लॅन्स डेटावर फोकस करणारे आहेत.

कंपनीची ऑफर लिमीटेड काळासाठी असून याची किंमत ३९ रुपयांपासून सुरु होते. कंपनी आपल्या सध्याच्या ४९ रुपयांच्या आणि ९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्सना रिवाइज केला आहे.ज्यामध्ये दोन नवे स्पेशल प्लॅन्स देण्यात आले आहेत. या पॅक्समध्ये आयपीएल २०२४ साठी कस्टमायजेशन करण्यात आले आहे, ज्यामुळे या पॅक मध्ये तुम्हाला अनलिमीटेड डेटा ऑफर केला जातोय.

Airtel रिचार्ज प्लॅन्सबद्दल बोलायचे झाल्यास आता ३९ रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये एक डेटा पॅक मिळतो, ज्यामध्ये एक दिवसाची व्हॅलिडीटी मिळते, यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटा मिळतो. दुसरा प्लॅन ४९ रुपयांचा आहे. यामध्ये देखील एक दिवसाची व्हॅलिडीटी आणि अनलिमीटेड डेटा मिळतो.

पण हा प्लॅन जरी एक दिवसाच्या व्हॅलिडीटीसह येत असला तरी रिचार्ज केल्याच्या दिवशीच याची वैधता रात्री १२ वाजता संपून जाते. ४९ रुपयांच्या प्लॅनसोबत कंपनी ३० दिवसांचे विंक प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

तर ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमीटेड डेटा मिळतो.तसेच या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी २ दिवस आहे. हा प्लॅन अनलिमीटेड असाला तरी याची एफयूपी २० जीबी आहे. म्हणजेच २० जीबी नंतर तुमची डेटा स्पीड कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT