Apple In India  esakal
विज्ञान-तंत्र

Apple In India : अॅपलने नव्या ऑफिससाठी घेतली बिल्डिंग, दरमहा 2.5 कोटी रुपये भाडं मोजणार

अॅपल इंडिया भारतात आपला व्यवसाय वाढवण्याचा तयारीत

सकाळ डिजिटल टीम

Apple In India : अॅपल इंडिया भारतात आपला व्यवसाय वाढवण्याचा तयारीत आहे. यासाठी अॅपलने नुकतीच बेंगळुरूमध्ये एक बिजनेस बिल्डिंग 10 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतली आहे. याआधी अॅपलने भारतातील पहिलं स्टोअर मुंबईत उघडलं आहे.

अॅपल बेंगळुरूमधील भाडेतत्त्वावरील बिल्डिंगसाठी दरमहा कोट्यवधी रुपये मोजणार आहे. अॅपलने बंगळूर मधील पॉश भागात असलेल्या प्रेस्टिज अॅसेट्स नावाच्या बिल्डिंग मधील अनेक मजले भाड्याने घेतले आहेत. ज्यासाठी कंपनी करोडो रुपये भाडे देणार आहे.

इतके भाडे द्यावे लागणार

भारतात अॅपलचं स्टोअर आणि ऑफिस सुरू झाल्याने भारतातील लोकांना अॅपलची उत्पादने खरेदी करण्यासाठी परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. डेटा अॅनालिटिक्स फर्म प्रॉपस्टॅकच्या मते, ऍपलने प्रेस्टिज अॅसेट्स प्रकल्पाच्या इमारतीचा चौथा, सहावा, सातवा, आठवा आणि नववा मजला 10 वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे.

यासाठी अॅपल दरमहा 2.43 कोटी रुपये भाडे देणार आहे. याशिवाय कार पार्किंगसाठी प्रत्येक महिन्याला 16.56 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. अॅपल इंडिया आणि प्रायव्हेट मुसा सैत वक्फ यांच्यात हा करार झाला आहे.

3 वर्षानंतर भाडं बदलणार

भाडे कराराप्रमाणे, अॅपलचे भाडे 3 वर्षांनी वाढेल. कराराच्या अटींनुसार, कराराचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असेल आणि भाडे दर तीन वर्षांनी 15% वाढेल. त्याचबरोबर या लीजची खास बाब म्हणजे अॅपलच्या कोणत्याही स्पर्धक कंपनीला या इमारतीत जागा दिली जाणार नाही.

भारतातील पहिले अॅपल स्टोअर मुंबईत सुरू

कंपनीने नुकतेच मुंबईत भारतातील पहिले स्टोअर उघडले आहे. यासाठी कंपनीने जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमधील शॉप 133 लीजवर घेतले आहे. यासाठी कंपनी दरमहा 42 लाख रुपये भाडे देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT