Twitter : ट्विटरने बीबीसीच्या निःपक्षपातीपणावर उपस्थित केला प्रश्न,वाचा काय आहे प्रकरण

ट्विटरने आपल्या नव्या धोरणात बीबीसीला सरकारी पैशावर चालणारी मीडिया कंपनी म्हणून संबोधलं
Twitter
Twitteresakal

Twitter : ट्विटरने आपल्या नव्या धोरणात बीबीसीला सरकारी पैशावर चालणारी मीडिया कंपनी म्हणून संबोधलं आहे. ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विट करून बीबीसीचा समाचार घेतला आहे.

Twitter
Maruti Jimny : एसयूव्हीच्या ताफ्यात दाखल होणार नवी मारुती जिम्नी! मे महिन्यात धावणार रस्त्यांवर

वास्तविक पाहता ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा ट्विटरसोबत वाद आहे. ट्विटरने बीबीसीच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटला 'सरकारी अनुदानित मीडिया' असं लेबल लावलंय. शिवाय बीबीसीला गोल्ड टिक ही दिलं आहे.

Twitter
WhatsApp Update : व्हॉट्सअॅप आणणार हटके फीचर, थेट फेसबुकशी होणार कनेक्ट

यावर बीबीसीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

या मुद्द्यावर बीबीसीने म्हटलंय की, स्टेट एफिलिएटेड मीडिया अकाउंट असं आउटलेट आहे, जिथे स्टेट फायनेंशियल रिसोर्सेस डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली पॉलिटिकल प्रेशर, प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्यूशनच्या माध्यमातून एडिटोरियल कंटेंट वर कंट्रोल ठेवतात.

Twitter
Air Conditioner : उन्हाळा सुरू झालाय! घरात ठेवा हा छोटा फॅन

त्यामुळे ट्विटरने ताबडतोब हे लेबल काढून टाकावं. कारण बीबीसी ही स्वतंत्र वृत्तसंस्था आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून ही एक लोकप्रिय वृत्तसेवा आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आम्ही ट्विटरच्या अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं देखील बीबीसीने आपल्या निवेदनात म्हटलंय.

Twitter
Google Search : गुगलमध्ये होणार मोठा बदल, सर्च इंजिनला मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीबीसीने ट्विटर व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरने सरकारी निधी मिळवणार्‍या खात्‍यांना असं गोल्ड टिक दिलेलं आहे. पण असं टिक किंवा लेबल कॅनडाच्या सीबीसी किंवा कतारच्या अल जझीरासारख्या स्टेट एफिलिएटेड मीडिया अकाऊंटवर दिसत नाही. बीबीसी न्यूजला ट्विटरवर 39.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com