Malicious Apps on PlayStore
Malicious Apps on PlayStore eSakal
विज्ञान-तंत्र

Malicious Apps : गुगलच्या प्ले-स्टोअरवरचे धोकादायक अ‍ॅप्स समोर, तुमच्या मोबाईलमध्ये तर नाहीत? लगेच करा डिलीट

Sudesh

गुगलच्या प्ले स्टोअरवर असणारे अ‍ॅप्स तसं तर सुरक्षित मानले जातात. मात्र, नवनवीन येणारे मालवेअर हे सिक्युरिटी वॉल्स भेदूनही पुढे जात असतात. त्यामुळे प्ले-स्टोअरवरील कित्येक अ‍ॅप्समध्येही व्हायरसचा शिरकाव होतो. सिंगापूरमधील एका सायबर सिक्युरिटी कंपनीने अशा अ‍ॅप्सची यादी जाहीर केली आहे.

सायफर्मा (CYFIRMA) या कंपनीच्या संशोधकांनी याबाबत अँड्रॉईड यूजर्सना इशारा दिला आहे. हे अ‍ॅप्स गुगल प्लेवर उपलब्ध असून, यामध्ये स्पायवेअर टाकण्यात आले असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. हे अ‍ॅप्स यूजरच्या फोनमधील डेटा चोरून बाहेरच्या देशात पाठवत असल्याचं समोर आलंय.

कोणते आहेत अ‍ॅप्स?

या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, nSure Chat आणि iKHfaa VPN असे हे दोन अ‍ॅप्स आहेत. SecurITY Industry नावाच्या एका कंपनीने हे अ‍ॅप्स लिस्ट केले आहेत. तुमच्या फोनमध्ये जर हे अ‍ॅप्स असतील तर तातडीने अनइन्स्टॉल करा, असा इशारा कंपनीने दिला आहे.

असा चोरतात डेटा

गुगलच्या प्लेस्टोअरवर असणारे हे अ‍ॅप्स डेटा चोरण्यासाठी परमिशनचा वापर करतात. अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर ते वापरण्यासाठी कॉन्टॅक्ट लिस्ट, लोकेशन आणि इतर गोष्टींचा अ‍ॅक्सेस मागतात. याची परमिशन दिल्यानंतर हे अ‍ॅप्स डेटा कलेक्ट करून हॅकर्सना पाठवतात.

काश्मीरमध्ये सायबर हल्ले

सायफर्माने दिलेल्या माहितीनुसार, हे अ‍ॅप्स यूजर्सच्या मोबाईलमधील माहिती चोरून डूनॉट नावाच्या एका हॅकिंग ग्रुपला शेअर करतात. याच हॅकिंग ग्रुपने काही दिवसांपूर्वी काश्मीर भागात सायबर हल्ले केले होते. यासोबतच पाकिस्तान आणि इतर दक्षिण आशियाई भागातही यांनी सायबर हल्ले केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT