Free Fire Update eSakal
विज्ञान-तंत्र

Free Fire Update : आता कमी स्टोरेजच्या फोनवरही खेळता येणार 'फ्री फायर' गेम; नवीन 'लो एमबी' अपडेट लाँच

Online Gaming : गेमची साईज कमी असली, तरी यामध्ये सर्व फीचर्स उपलब्ध असणार आहेत.

Sudesh

मोबाईल गेमर्ससाठी एक मोठी बातमी आहे. आता फ्री फायर ही गेम अगदी कमी स्टोरेज असणाऱ्या मोबाईल किंवा टॅबलेटमध्ये देखील खेळता येणार आहे. Free Fire OB42 असं एक नवीन अपडेट आलं आहे. यामुळे सेम क्वालिटीची गेम कमी एमबीमध्ये डाऊनलोड करून खेळता येणार आहे.

फ्री फायरचं हे लेटेस्ट व्हर्जन यूजर्स गुगलच्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरअवरुन डाऊनलोड करू शकतात. यामध्ये काही नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहेत. तसंच, काही काळापर्यंत गेमर्सना मोफत रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.

Free Fire OB42 हा अपडेट खास अशा गेमर्ससाठी देण्यात आलेला आहे, ज्यांच्याकडे गेमिंगसाठीचे तगडे स्मार्टफोन नाहीत. Low MB डाऊनलोड फीचर दिल्यामुळे अगदी कमी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये देखील ही गेम डाऊनलोड करता येणार आहे. सोबतच, अशा स्मार्टफोनवर देखील गेमिंगची चांगली मजा यावी यासाठी गेमच्या डिझाईनमध्ये देखील काही बदल करण्यात आलेला आहे. (Gaming News)

तडजोडीची गरज नाही

गेमची साईज कमी झाल्यामुळे काही फीचर्स उपलब्ध होणार नाहीत, अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल; तर चिंता सोडा. या अपडेटमध्ये साईज कमी असली, तरी या गेममधील मुख्य एलिमेंट्स तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गेमर्सना कोणतीही तडजोड करण्याची गरज भासत नाही.

या नव्या अपडेटमुळे अधिकाधिक गेमर्स ही गेम डाऊनलोड करतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या माध्यमातून फ्री फायर कम्युनिटीमध्ये वाढ होण्याची आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT