google
google sakal
विज्ञान-तंत्र

Independence Day 2023: विविधतेत एकता, भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी GOOGLE Doodle कडून देशाला खास सन्मान

Aishwarya Musale

देश आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गुगलही हा खास सोहळा आपल्या खास शैलीत साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने एक अनोखे डूडल तयार केले आहे. 15 ऑगस्टच्या निमित्तानं गुगल सर्चमध्ये गेल्यास इथे तुम्हाला विविध प्रकारचे कापड आणि त्यावर गुगल लिहिलेली एक कलाकृती पाहायला मिळेल.

गुगलने डूडलसोबत पोस्ट केलेल्या टेक्स्टमध्ये म्हटले आहे की, 1947 मध्ये या दिवशी एक नवीन युग सुरू झाले, जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. १५ ऑगस्टचे हे गुगल डूडल नवी दिल्ली येथील अतिथी कलाकार नम्रता कुमार यांनी डिझाइन केले आहे.

कशी मिळाली प्रेरणा?

कुमार यांनी डूडलमागील विचार आणि त्यांची प्रेरणा याबद्दलही माहिती दिली. या डूडलच्या माध्यमातून तिला देशातील विविध भौगोलिक प्रदेश संतुलित पद्धतीने दाखवायचे असल्याचे तिने सांगितले.नम्रताने सगळ्यात पहिले भारतात अस्तित्वात असणाऱ्या वस्त्रोद्योग आणि हस्तकला प्रकारांची माहिती मिळवली.

नंतर तिने एम्ब्रॉयडरी, एनकम्पासिंग, विविध प्रकारची विणकामं, छापकाम, डाय तंत्र, हातानं कापडावर चित्र रेखाटण्याची कला, या अशा प्रकारांची माहिती मिळवली आणि त्यांचं प्रतिबिंब या डूडलमध्ये साकारलं.

गुगल दोन दशकांपासून स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे

गुगल डूडल दोन दशकांहून अधिक काळ भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दरवर्षी डूडल भारतीय संस्कृती किंवा इतिहासाच्या वेगळ्या पैलूचा गौरव करते. 2004 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने पहिले डूडल लाईव्ह केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: "हाती आलेले निकाल हे..." बारामतीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Bajarang Sonawane: "जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला"; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर बजरंग सोनावणेंनी व्यक्त केल्या भावना

Lok Sabha Election Result 2024 : सर्व्हे चुकीचा ठरतोय दिसताच अॅक्सिस माय इंडियाच्या प्रमुखाला कोसळलं रडू

Beed Constituency Lok Sabha Election Result: बीडमध्ये फिरली बजरंगाची गदा! पंकजा मुडेंचा चुरशीच्या लढतीत पराभव

Odisha Assembly Election : भाजपचा २५ वर्षांपासून एकतर्फी सत्ता गाजवणाऱ्या BJDला धोबीपछाड! ८० जागा जिंकत मिळवलं स्पष्ट बहुमत

SCROLL FOR NEXT