Lok Sabha Election Result 2024 : सर्व्हे चुकीचा ठरतोय दिसताच अॅक्सिस माय इंडियाच्या प्रमुखाला कोसळलं रडू

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानं देशातील राजकारणाचा वेगळाच मूड सेट केला आहे.
Axis
Axis

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानं देशातील राजकारणाचा वेगळाच मूड सेट केला आहे. दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोलमधून जे चित्र समोर आलं होतं, निकाल त्यापेक्षा खूपच वेगळा होता. अनेक एक्झट पोल कंपन्यांनी भाजपप्रणित एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. काहींनी तर हा आकडा ४०० पार जाईल असं दाखवलं होतं. पण ४ जूनला आलेल्या निकालानं हे सर्व एक्झिट पोल खोटे असल्याचं सिद्ध केलं. (Lok sabha Election Result 2024 head of Axis My India burst tears into live programme on tv news)

Axis
Lok Sabha Election 2024: काँग्रेसची कामगिरी चांगली, परंतू विधानसभेपर्यंत टिकणार का?

अॅक्सिस माय इंडियाच्या प्रमुखाला रडू कोसळलं

दरम्यान, इंडिया टुडे ग्रुपसाठी सर्व्हे करणारी कंपनी अॅक्सिस माय इंडियानं आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. इतकंच नाही तर ४०० जागा मिळतील असंही म्हटलं होतं. पण खरंतर एनडीए ३००चा आकडाही गाठू शकली नाही. त्यामुळं अॅक्सिस माय इंडियाचे प्रमुख प्रदीप गुप्ता सोशल मीडियावर ट्रोल होत होते. एका न्यूज चॅनेलवर चर्चेदरम्यान तर त्यांना आपला एक्झिट पोल चुकीचा ठरत असल्याचं दिसताच रडू कोसळलं.

Axis
Bajarang Sonawane: "जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला"; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर बजरंग सोनावणेंनी व्यक्त केल्या भावना

लाईव्ह दरम्यान रडू कोसळलं

इंडिया टुडेच्या लाईव्ह कव्हरेजदरम्यान प्रदीप गुप्ता एग्झिट पोलवर चर्चेमध्ये सहभागी झाले होते. याचवेळी त्यांच्या एक्झिट पोलवर चर्चा सुरु होती यावेळी त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. यावेळी अँकरनं त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तसंच डोळे पुसण्यासाठी रुमाल दिला.

Axis
PM Modi : "सहा दशकांनंतर मतदारांनी इतिहास रचला"; विजयी भाषणानंतर PM मोदींनी मानले देशवासियांचा आभार

अॅक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये काय होतं?

अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६१ ते ४०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर इंडियाला १३१-१६६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तर इतरांना ८-२० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. पण आता निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निकालानुसार, एनडीएला २९३ जागा तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.