Hyundai Discount Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Hyundai Discount Offers : सुट्ट्यांमध्ये फिरा नव्या गाडीत! ह्युंडाई देतंय बंपर डिस्काउंट.. जाणून घ्या ऑफर्स

Hyundai Car Offers : ह्युंडाईच्या i20 या कारवर सुमारे 45,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांच्या एक्स्चेंज बोनसचा देखील समावेश आहे.

Sudesh

Hyundai Car Discount : भारतात ह्युंडाई या कंपनीच्या गाड्या बऱ्याच लोकप्रिय आहेत. तुम्हीदेखील नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ह्युंडाईने मे महिन्यात आपल्या बऱ्याच गाड्यांवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. यामध्ये i20, ग्रँड i10 निओस, व्हेन्यू आणि एक्स्टर या गाड्यांचा समावेश आहे. कोणत्या गाडीवर नेमका किती डिस्काउंट मिळतोय? जाणून घेऊया..

ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस

ह्युंडाई सर्वाधिक डिस्काउंट आपल्या Grand i10 Neos या कारवर देत आहे. यावर कॅश डिस्काउंट, कॉर्परेट डिस्काउंट आणि एक्स्चेंज बेनिफिट्स मिळून सुमारे 48 हजार रुपयांची सूट मिळत आहे. टाटा टियागो आणि मारुती स्विफ्टला ही हॅचबॅक कार टक्कर देते.

ह्युंडाई आय20

ह्युंडाईच्या i20 या कारवर सुमारे 45,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांच्या एक्स्चेंज बोनसचा देखील समावेश आहे. तसंच काही प्रमाणात कॅश डिस्काउंट देखील दिला जात आहे.

एसयूव्ही कार्स

ह्युंडाईची कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार व्हेन्यू (Venue) ही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या कारवर सुमारे 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यातील 25,000 रुपये हा कॅश डिस्काउंट आहे; तर 10 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आहे. यासोबतच Hyundai Exter कारवर देखील सुमारे 10,000 रुपये कॅश डिस्काउंट मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT