ह्युंदाई सँट्रो कार
ह्युंदाई सँट्रो कार 
विज्ञान-तंत्र

Hyundai च्या बेस्ट सेलिंग कारवर ४० हजारांपर्यंत डिस्काऊंट

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई आपल्या निवडक करवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर देत आहे. येथे आम्ही तुम्हाला कंपनीचे बेस्ट सेलिंग हॅचबॅक सँट्रो कारविषयी सांगणार आहोत. तुम्हाला तिच्यावर ४० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकते. ह्युंदाईतर्फे ४० हजार रुपयांपर्यत सँट्रोच्या मेग्ना, स्पोर्ट्ज आणि एस्टा ट्रिम माॅडलवर डिस्काऊंट उपलब्ध आहे. हे डिस्काऊंट ऑफर सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद पाहून ती वाढवली जाऊ शकते. ह्युंदाई सँट्रोच्या या व्हेरिएंटवर मिळणाऱ्या डिस्काऊंटमध्ये २५ हजार रुपयांचे कॅश डिस्काऊंट, १० हजार रुपयांचे एक्स्चेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचे काॅर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश आहे. ह्युंदाई सँट्रोवर मिळणाऱ्या डिस्काऊंटचा तपशील जाणून घेतल्यानंतर जर तुम्हाला ही कार खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. जाणून घेऊ ह्युंदाई सँट्रोची किंमतीपासून फिचर्स आणि मायलेजपासून स्पेसिफिकेशनचे पूर्ण तपशील.

- कंपनीची ह्युंदाई सँट्रो ही हॅचबॅक सेगमेंट कार मध्यम वर्गामध्ये खूप लोकप्रिय आहे. कंपनीने ही कार चार प्रकारात लाँच केली आहे.

- या कारमध्ये आहे १०८६ सीसीचे इंजिन आहे. हे इंजिन १.१ लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे. जे ६९ पीएसची पाॅवर आणि ९९ एनएमचा टाॅर्क जनरेट करते. या इंजिनबरोबर कंपनीने ५ स्पीड एमटी गिअरबाॅक्सचा पर्याय दिला आहे.

- कारच्या फिचर्समध्ये तुम्हाला ७.० इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिला गेला आहे. त्याबरोबर अॅपल कार प्ले आणि अँड्राॅईड ऑटो कनेक्टचे फिचर मिळते.

- या बरोबरच कारमध्ये कॅमेऱ्याबरोबर रिअर पार्किंग सेन्सर, रिअर एसी, पाॅवर विंडो, पाॅवर स्टेअरिंगसारखे फिचर्सही आहेत. कारच्या सुरक्षेविषयी बोलाल तर त्यात फ्रंट सीट्सवर ड्युअल एअरबॅग, एबीएस, ईबीडीसारखे फीचर्स दिले गेले आहेत.

- कंपनीने मायलेजच्या बाबत केलेल्या दाव्यानुसार ही कार २०.३ किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते. या कारची किंमत ४.७६ लाख रुपयाला सुरु होते. टाॅप माॅडलमध्ये गेल्यावर ६.४४ लाख रुपयांवर जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT