isro
isro 
विज्ञान-तंत्र

भारत जपानसोबत चंद्रावर पाठवणार यान; LUPEX मिशनचा ISRO ने घेतला आढावा

सकाळवृत्तसेवा

बेंगलुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो जपानसोबत काम करत आहे. जपानची अंतराळ संस्था एअरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजेन्सी Japan Aerospace Exploration Agency (JAXA) अर्थात जाक्सासोबत 2024 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान पाठवण्याची तयारी इस्रो करत आहे. यासाठी दोन्हीही देशांचे अंतराळ संशोधक तयारी करत आहेत. Lunar Polar Exploration (LUPEX) mission म्हणजेच चंद्राच्या ध्रुवावरील संशोधन अभियानाबाबतच्या भागीदारीचा दोन्ही देशांच्या अंतराळ संस्थांनी संयुक्तरित्या आढावा घेतला. याअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 2024 च्या आसपास अंतराळयान पाठवण्याचं ध्येय आहे. 

अंतराळ विभागाचे सचिव तसेच इस्रोचे प्रमुख के. सिवन आणि जाक्साचे अध्यक्ष हिरोशी यामाकावा यांनी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या द्विपक्षीय बैठखीत आपापल्या प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व केले. इस्रोने आपल्या वक्तव्यात म्हटलंय की, पृथ्वी अवलोकन, चंद्र सहयोग आणि उपग्रहांचे नेव्हीगेशन यांसदर्भात जागरुकतेबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली.

तसेच करारावर हस्ताक्ष झाले. भारत आणि जपानच्या संयुक्त मिशन मूनच्या योजनेची घोषणा 2017 मध्ये करण्यात आली होती. जर दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 ची यशस्वी लँडींग झाली तर या योजनेला आणखी पुढे घेऊन जाता येईल. यासंदर्भात इस्रो आणि जाक्साचे संशोधक सातत्याने काम करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT