Lava Yuva 3
Lava Yuva 3 esakal
विज्ञान-तंत्र

Lava Yuva 3 : फक्त 7 हजारांमध्ये मिळतोय Lava चा मोबाईल, जाणून घ्या दमदार फिचर्स

Monika Lonkar –Kumbhar

Lava Yuva 3 : लावा कंपनीने फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात Lava Yuva 3 हा नवा मोबाईल भारतीय ग्राहकांसाठी लाँच केला आहे. लावाचा हा नवा मोबाईल तुम्हाला ७ हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळू शकतो.

त्यामुळे, ग्राहकांचे विशेष लक्ष या मोबाईलने वेधले आहे. जर तुम्ही या महिन्यात नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लावाच्या या नव्या मोबाईलचा विचार करायला हरकत नाही. आज आपण लावाच्या या मोबाईलचे फिचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

ऑनलाईन खरेदीसाठी कधी होणार उपलब्ध ?

लावाचा हा नवा Lava Yuva 3 मोबाईल विक्रीसाठी ७ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. तुम्हाला जर हा मोबाईल ऑनलाईन खरेदी करायचा असेल तर अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही खरेदी करू शकता. त्यापूर्वी त्याच्या फिचर्सवर एक नजर टाकूयात.

Lava Yuva 3 चे फिचर्स

या मोबाईलच्या रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास या मोबाईलमध्ये तुम्हाला 4GB + 4GB पर्यंतची रॅम मिळते. आता स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलमध्ये 64GB आणि 128GB UFS 2.2 असे स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे तुम्ही मोबाईलची खरेदी करू शकता. यासोबतच मायक्रोएसडी कार्डने तुम्ही मोबाईलचे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवू शकता.

लावा युवा 3 च्या डिस्प्ले आणि प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलचा डिस्प्ले 6.5इंच HD+ सह उपलब्ध असणार आहे. यासोबतच 90Hz रिफ्रेश रेटसह हा मोबाईल तुम्हाला खरेदी करता येईल.

कॅमेरा आणि बॅटरी

लावा मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलमध्ये तुम्हाला १३ मेगापिक्सेल्सचा तगडा रियर कॅमेरा मिळेल. यासोबतच LED फ्लॅश देखील मिळेल. यात सेल्फीसाठीचा फ्रंट कॅमेरा हा 5MP चा असणार आहे.

लावाच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास या मोबाईलमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी आणि 18W चे दमदार चार्जिंग फिचर या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल.

कलर ऑप्शन्स

लावा कंपनीने Lava Yuva 3 हा मोबाईल Eclipse Black, Cosmic Lavender आणि गॅलक्सी व्हाईट अशा ३ रंगांमध्ये सादर केला आहे. त्यामुळे, या तिन्हीपैकी तुम्हाला आवडणाऱ्या रंगाचा मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता.

लावाचा नुकताच लाँच झालेला हा मोबाईल तुम्हाला ४GB रॅम + ६४GB स्टोरेज सह ६ हजार ७९९ रूपयांना मिळू शकतो. यासोबतच या फोनचा टॉप व्हेरिएंट ४GB रॅम + १२८GB स्टोरेजसह ७ हजार २९९ रूपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Constituency Lok Sabha Election Result: बीडमध्ये फिरली बजरंगाची गदा! पंकजा मुडेंचा चुरशीच्या लढतीत पराभव

PM Modi : "सहा दशकांनंतर मतदारांनी इतिहास रचला"; विजयी भाषणानंतर PM मोदींनी मानले देशवासियांचा आभार

Ajit Pawar: चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी.. पराभवानंतर अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश

India Lok Sabha Election Results Live : विरोधक एकजूट होऊनही भाजप इतक्या जागा जिंकू शकले नाहीत - मोदी

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT