Calling Smartwatch : कॉलिंगसाठी या स्मार्टवॉचची डिझाईनच नव्हे, तर फिचर्सही दमदार; जाणून घ्या किंमत

कॉलिंग फीचर्ससह टॉप-4 स्मार्टवॉच; दोन हजारांहून कमी किंमत
Calling Smartwatch : कॉलिंगसाठी या स्मार्टवॉचची डिझाईनच नव्हे, तर फिचर्सही दमदार; जाणून घ्या किंमत

मार्केटमध्ये स्मार्टवॉचचे आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातील स्मार्टवॉच आल्या त्या वेळी त्यांची किंमत आवाक्याबाहेर होती. सर्वसामान्य नागरिकांना स्मार्टवॉच घेणे परवडत नव्हते. आता मात्र या मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आल्या आहेत.

स्पर्धा वाढल्याने स्मार्टवॉच निर्मात्या कंपन्यांनी आपल्या प्रोडक्टची किंमत कमी करुन त्यात जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारात अनेक कॉलिंग स्मार्टवॉच आहेत ज्यातून तुम्ही तुमचा आवडता पर्याय निवडू शकता. तर आज आम्ही तुमच्यासाठी काही दमदार पर्याय आणले आहेत जे स्टायलिश तर आहेच पण चांगल्या फीचर्सचाही समावेश आहे.

Boult Crown

हे स्मार्ट वॉच 1.95 इंच डिस्प्लेसह ऑफर केले जाते ज्यामध्ये तुम्हाला झिंक अलॉय फ्रेम तसेच वर्किंग क्राउन मिळेल. केवळ मोठा डिस्प्लेच नाही तर 900 nits चा पीक ब्राइटनेस ही त्याची खासियत आहे. तुम्हाला स्मार्ट वॉच spo2 मॉनिटर देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकता. या स्मार्टवॉचची किंमत 1,299 रुपये आहे.

Calling Smartwatch : कॉलिंगसाठी या स्मार्टवॉचची डिझाईनच नव्हे, तर फिचर्सही दमदार; जाणून घ्या किंमत
WhatsApp India Action : व्हॉट्सअ‍ॅपची मोठी कारवाई.. भारतातील तब्बल 69 लाख अकाउंट्स केले बॅन!

Fastrack Revoltt FS1 Max

Fastrack च्या या स्मार्टवॉचमध्ये ग्राहकांना कर्व डिस्प्लेसह ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते, ज्यामुळे तुम्ही फोन बाहेर न काढता कॉल करू शकता. एवढेच नाही तर या स्मार्ट वॉचमध्ये 100 हून अधिक मल्टी-स्पोर्ट्स फीचर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचमध्ये 1.95 इंचाचा मोठा डिस्प्ले पाहायला मिळतो. ज्यावर तुम्ही सर्व अ‍ॅक्टिव्हिटीजला मॉनिटर करू शकता. या स्मार्टवॉचची किंमत 2,099 रुपये आहे.

Noise Thrive

या स्मार्ट वॉचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे म्युझिक प्लेबॅक आणि व्हॉईस असिस्टंट. स्मार्ट वॉचच्या आत एक मोठा 1.85 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे आणि हे स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंग वैशिष्ट्यासह येते. स्मार्ट वॉचची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे जेणेकरून ती प्रत्येकाच्या बजेटमध्ये आरामात बसू शकेल. या स्मार्टवॉचची किंमत 1,199 रुपये आहे.

पेबल कॉसमॉस व्हॉल्ट

या स्मार्टवॉचची खासियत म्हणजे त्याची प्रीमियम चेन डिझाइन जी खूप महाग दिसते, पण त्याची किंमत खूपच कमी आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या स्मार्ट वॉचमध्ये, ग्राहकांना 1.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते. या स्मार्टवॉचची किंमत 1,799 रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com