
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये एनडीएला २९४ जागांवर आघाडी असून २४४ जागांवर इंडिया आघाडी आघाडीवर आहे. तर १६ जागांवर अपक्षांना मिळण्याची शक्यता आहे. यांपैकी बहुतेक जागांवरील उमेदवार विजयी झाले असून भाजपप्रणित रालोआनं बहुमताचा आकडा पार केला आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यालयात देशवासियांसह भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसंच सहा दशकांनंतर मतदारांनी इतिहास रचल्याचं त्यांनी म्हटलं. (after six decades voters create history says PM Modi thanked people after victory speech)
मोदी म्हणाले, "सहा दशकांनंतर देशाच्या मतदारांनी एक नवा इतिहास रचला आहे. ६ दशकांनंतर एखाद्या युतीला अर्थात एनडीएला सातत्यानं तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. जनता-जनार्दन सोबत विश्वासाचं हे अतूट नातं आहे. ही लोकशाहीची मोठी शक्ती आहे. तुमचा आशीर्वाद नवा उत्साह, नवी उमेदीसह काम करण्याची आमची उर्जा कायम आहे"
विरोधक एकजूट होऊनही भाजप इतक्या जागा जिंकू शकले नाहीत
विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, विरोधक एकजूट होऊनही भाजप इतक्या जागा जिंकू शकले नाहीत. तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयांचा एक मोठा अध्याय लिहीलं. ही मोदींची गॅरंटी आहे. गरीबी इतिहासात जमा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत देशाचं डिफेन्स सेक्टर आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.