Maruti CNG Car
Maruti CNG Car Sakal
विज्ञान-तंत्र

CNG Car : कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! Baleno अन् XL6 चे CNG मॉडेल लाँच

सकाळ डिजिटल टीम

Maruti Suzuki Baleno and XL6 CNG : मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी 'Nexa' अंतर्गत विकल्या जाणार्‍या दोन कारचे CNG मॉडेल लॉन्च केले आहे. यामध्ये प्रीमियम हॅचबॅक बलेनो आणि MPV XL6 CNG सह लॉन्च केली आहे. चालू आर्थिक वर्षात सीएनजी वाहनांची विक्री 75 टक्क्यांनी वाढवून चार लाख युनिटपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

लाॉन्च केलेल्या CNG कारची किंमत 8.28 लाख ते 12.24 लाख रुपये आहे, अशी माहिती विक्री आणि विपणनचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली आहे. तसेच यावर्षी सुमारे चार लाख सीएनजी कार विकण्याचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी कंपनीने 2.3 लाख कार विकल्या होत्या.

बलेनोची विक्री नोव्हेंबरपासून होणार सुरू

श्रीवास्तव म्हणाले की, कंपनीने 2010 मध्ये इको, अल्टो आणि वॅगन-आर या तीन मॉडेल्ससाठी CNG पर्याय ऑफर केली होती. त्याअंतर्गत कंपनीने आतापर्यंत एकूण 11.4 लाख CNG वाहनांची विक्री केली आहे. आज एकूण 16 मॉडेल्सपैकी 10 सीएनजी आहेत. त्यानंतर आता नव्याने दोन नवीन मॉडेल्स लाँच करण्यात येत आहेत. आज लाँच करण्यात आलेल्या बलेनो आणि XL6 च्या CNG कारचे उत्पादन आधीच सुरू झाले असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून याची विक्री सुरू केली जाणार आहे.

किंमत किती?

बलेनो एस-सीएनजी दोन प्रकारात उपलब्ध असेल. यामध्ये डेल्टा, मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी (MT) 8.28 लाख रुपये आणि Zeta (MT) साठी 9.21 लाख रुपये मोजावे लागणार आहे. तर, XL6 S-CNG केवळ Zeta (MT) पर्यायात उपलब्ध असेल. ज्याची किंमत 12.24 लाख रुपये असेल. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात अजूनही सगळ्यात मागे

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT