most affordable electric car tata tiago ev launched in india
most affordable electric car tata tiago ev launched in india  
विज्ञान-तंत्र

टाटाने लॉंच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत-रेंज

सकाळ डिजिटल टीम

सध्याच सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि या काळात ऑटोमोबाईल मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात भर घालत, टाटा मोटर्सने आज इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आणखी एक मॉडेल लाँच केले आहे. ही नवी कार Tata Tiago EV देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही कार तुम्ही फक्त 8.49 लाख रुपयांना खरेदी करू शकता. ही गाडी तुम्हाला 10 ऑक्टोबरपासून बुक करता येणार आहे आणि त्याची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. (most affordable electric car tata tiago ev launched in india)

इंटेरियर कसे आहे

पेट्रोल आवृत्तीच्या तुलनेत टिगोर ईव्हीच्या इंटीरियर्स मध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. याचा डॅशबोर्ड ड्युअल कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. यासोबतच प्रीमियम लेदर सीट कव्हर्स, हरमनची इन्फोटेनमेंट सिस्टम, अधिक उत्कृष्ट सीट कुशन देण्यात आले आहेत. या कारचा बेसिक प्लॅटफॉर्म पूर्वीसारखाच आहे.

रेंज किती आहे?

या इलेक्ट्रिक कारमधील इलेक्ट्रिक मोटर 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते जी 26kWh बॅटरी पॅकसह जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. यासोबतच यामध्ये फास्ट चार्जरसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ते केवळ 1 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.

फीचर्स

Tata Tiago EV मध्ये Z Connect सह स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टीपल ड्राइव्ह मोड, फॉग लॅम्प, मल्टी-मोड रीजन फंक्शन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती आहे?

Tata Tiago EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीच्या या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.79 रुपयांपर्यंत जाते.

Tata Tiago EV ही सेगमेंटमधील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही ईव्ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामुळे बाजारात अद्याप फारशी स्पर्धा नाही. पण येत्या काळात या सेगमेंटमध्ये इतर इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT