विज्ञान-तंत्र

आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलात ‘परजीवी’ची नवी जात

संजय खूळ

कोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या या परजीवी जातीला ‘व्हिस्कम सह्याद्रीकम’ असे नाव दिले. 

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद सरदेसाई, सोलापुरातील वालचंद महाविद्यालयातील डॉ. सयाजीराव गायकवाड आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रा. एस. आर. यादव यांच्या चमूने गेली १५ वर्षे अभ्यास करून हे संशोधन प्रकाशित केले आहे. व्हिस्कमच्या अनेक जाती रक्तक्षय आणि अनेक प्रकारच्या कर्करोगांवर औषध म्हणून वापरल्या जातात. भारतात आढळणाऱ्या काही जातीदेखील अशाच प्रकारे काही आजारांच्या उपचारामध्ये वापरल्या जातात. 

इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱ्या ‘एडिनबोरो जर्नल ऑफ बॉटनी’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा अहवाल नुकताच प्रकाशित 
झाला आहे. महाराष्ट्रातील आजरा आणि आंबोलीच्या जंगलात, तर कर्नाटकातील कुद्रेमुख परिसरात आंबा, जांभूळ आदी वृक्षांवर परजीवी म्हणून वाढणाऱ्या बांडगुळांवर ही जात परजीवी म्हणून वाढते. मराठीतील ‘चोरावर मोर’ ही म्हण या जातीला अतिशय चपलख बसते.

हाडसांधी, हाडजोडी, बांदा अशी स्थानिक मराठी नावे असणाऱ्या व्हिस्कमला इंग्रजीत ‘मिस्लटो’ म्हणून ओळखले जाते. व्हिस्कम प्रजातींच्या जगभर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात सुमारे १२० जाती आढळतात. त्यातील केवळ १७ जाती भारतीय जंगलामधून परजीवी स्वरूपातच आढळतात. त्यातील काही पाने असणाऱ्या, तर काही पाने नसणाऱ्या आहेत. व्हिस्कमच्या कुळाबद्दल मात्र अनेक एकमेकाविरोधी मते आहेत. काहींनी त्याला बांडगुळाच्या कुळात म्हणजे व्हिसकेसी आणि अद्ययावत जनुकशास्त्रीय वर्गीकरणात, तर अगदी चंदनाच्या म्हणजे सांटालेसी कुळात ठेवलेले आहे.

व्हिस्कमला तीन किंवा पाच एकलिंगी फुलांचा फुलोरा येतो. त्यातील मधले फुल नर आहे की मादी आहे, त्यावर त्यांचे वर्गीकरण केले जाते. साधारणतः अवघ्या दीड मिलीमीटर आकाराची अतिशय लहान आणि एकलिंगी फुले असणाऱ्या व्हिस्कम सह्याद्रीकमच्या परागिकरणाची प्रक्रिया मुंग्यांकडून केली जाते; तर गंमत म्हणजे बीजप्रसार पक्ष्यांमार्फत केला जातो.

साधारणतः ज्या बांडगुळावर ही वनस्पती परजीवी म्हणून वाढते, त्याच्या फळांबरोबरच या परजीवीचीही फळे पक्व होतात. या परजीवीची पिकलेली फळे मग पक्षी खातात आणि त्यांच्या विष्ठेतून रुजू घातलेल्या बिया इतरत्र पसरविल्या जातात. 
- प्रा. डॉ. मिलिंद सरदेसाई,
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT