How to use OpenAI Codex tool for coding esaal
विज्ञान-तंत्र

OpenAI Codex : फ्रीमध्ये कोडिंग शिकायचंय? OpenAI ने लॉन्च केलं 'Codex' टूल; कसं वापरायचं, पाहा एका क्लिकवर

OpenAI ने 'Codex' हे नवीन एआय टूल सादर केले आहे जे कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अधिक सोपे करते. हे टूल कसे वापरायचे जाणून घेऊया.

Saisimran Ghashi

Codex AI Tool : सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये क्रांती घडवणारे नवीन एआय टूल 'Codex' आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI ने नुकतेच हे अत्याधुनिक टूल लॉन्च केले असून, ते विशेषतः कोड लिहिणे, समजून घेणे आणि त्यात सुधारणा करणे यासाठी तयार करण्यात आले आहे.

'Codex' ही फक्त एखादी कोडिंग सहाय्यक प्रणाली नसून एक स्मार्ट क्लाउड बेस्ड इंजिनिअरिंग सहकारी आहे जी अनेक कोडिंग कामे एकाच वेळी हाताळू शकते. हे टूल थेट ChatGPT मध्ये समाविष्ट करण्यात आले असून वापरकर्ते चॅटजिपीटीच्या साइडबारमधून थेट कोडिंग टास्क देऊ शकतात. "Code" या पर्यायावर क्लिक करून काम सुरु करता येते आणि जर कोड संदर्भात काही प्रश्न असतील तर "Ask" बटणाद्वारे मदत घेता येते.

'Codex' काय करू शकते?

  • कोडमधील बग्स शोधून त्याचे उत्तर देते

  • कोडबेस संदर्भातील सखोल तांत्रिक माहिती देते

  • नवीन कोड इम्प्लिमेंट करते

  • चाचणी (Testing) होईपर्यंत कोड सुधारते

  • पूर्ण प्रक्रिया वापरकर्त्याला टर्मिनल लॉग्स आणि टेस्ट आऊटकम्सद्वारे पाहता येते

Codex' मागे आहे अत्याधुनिक 'o3 reasoning model' ज्यामुळे हे टूल माणसासारख्या पद्धतीने कोड तयार करते. प्रत्येक टास्कसाठी एक स्वतंत्र क्लाउड वर्कस्पेस तयार केला जातो जिथे तुमचे सर्व कोड फायली आधीच उपलब्ध असतात. वापरकर्ते हा कोड स्थानिक सिस्टिममध्ये एकत्र करू शकतात किंवा GitHub वर थेट अपलोडही करू शकतात.

टास्क पूर्ण करण्यास लागणारा वेळ हा कामाच्या गुंतागुंतीनुसार बदलतो, सरासरी वेळ 1 ते 30 मिनिटांदरम्यान असतो.

Codex कोणासाठी उपलब्ध आहे?


सध्या हे टूल ChatGPT Pro, Enterprise आणि Team सबस्क्रिप्शन प्लॅन वापरणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. OpenAI लवकरच ChatGPT Plus आणि Edu वापरकर्त्यांसाठीही हे टूल सुरु करणार आहे मात्र अद्याप त्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही.

शिक्षण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी Codex हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. कोडिंग शिकण्याची आणि अंमलात आणण्याची पद्धतच Codex बदलू शकतो, असा विश्वास OpenAI ने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT