POCO M6 5G eSakal
विज्ञान-तंत्र

POCO M6 5G : 50 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा 5G फोन अन् किंमत 10 हजारांपेक्षा कमी! पोकोचा नवीन स्मार्टफोन लाँच

हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन असे पर्याय यात मिळतात. यात तीन व्हेरियंट आहेत.

Sudesh

Poco M6 5G Launched : पोकोने भारतीय मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. POCO M6 असं या 5G स्मार्टफोनचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी लाँच केलेल्या M6 Pro या स्मार्टफोनचं हे दुसरं व्हेरियंट आहे. अगदी कमी किंमतीत यात फ्लॅगशिप दर्जाचे फीचर्स देण्यात आले आहेत.

POCO M6 5G या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच मोठा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसंच यात गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. (Smartphone Under 10K)

हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन असे पर्याय यात मिळतात. यात तीन व्हेरियंट आहेत. 4GB+128GB हा बेस व्हेरियंट आहे. याची किंमत 10,499 रुपये आहे. 6GB+128GB या मिड व्हेरियंची किंमत 11,499 रुपये आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये आहे. (Budget Smartphone)

या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 1TB एवढं वाढवता येतं. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यातील प्रायमरी कॅमेरा 50MP क्षमतेचा आहे. यातील सेल्फी कॅमेरा मात्र केवळ 5MP क्षमतेचा आहे. यामध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (5G Smartphone Under 10K)

ऑफर्स

या फोनची विक्री 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ICICI क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर ही ऑफर लागू होते. यामुळे बेस व्हेरियंटची किंमत ही 9,499 रुपये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षाच्या पूर्वसंध्येला उजनी धरण १०० टक्के भरेलेलेच; शेतकऱ्यांना १५ जानेवारीनंतर रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन, वाचा...

आजचे राशिभविष्य - 29 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: गव्हाच्या पीठात कांदा टाकून बनवा 'हा' खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

Satara Crime:'शिरवळला मारहाणीतून एकाचा खून';दोघेजण पाेलिसांच्या ताब्‍यात, एकुलता एक मुलाबाबत घडला धक्कादायक प्रकार?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT