redmi 11 prime 5g india launch date confirmed for 6 september know price and features here  
विज्ञान-तंत्र

कंन्फर्म! लवकरच येतोय Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; 'या' तारखेला होईल लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

Redmi ने अखेरीस आपला बजेट 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे . महत्वाचे म्हणजे हा Redmi चा फोन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो. Redmi ने 6 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात नवीन Redmi 11 Prime 5G लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.नवीन स्मार्टफोनची किंमत बजेट सेगमेंटमध्ये असण्याची अपेक्षा असून आणि कंपनीने आजपासून मीडिया निमंत्रणे रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.

Redmi 11 Prime 5G ची भारतातील संभाव्य किंमत किती?

भारतात या Redmi फोनची किंमत जवळपास 12,000 रुपये असू शकते. हा फोन तुम्ही Flipkart आणि Mi.com वरून खरेदी करू शकाल.

Redmi 11 Prime 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Redmi 11 Prime 5G मध्ये फुल HD+ (1080 x 2048 pixels) IPS LCD डिस्प्ले असेल, ज्याचा आकार अंदाजे 6.58 इंच असेल. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. या फोनमध्य मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेट असू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP ड्युअल बॅक कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. यापेकी एक 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि एक LED फ्लॅश असेल असे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर अपेक्षित आहे. Redmi 11 Prime मध्ये 5,000mAh बॅटरी असू शकते जी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच फोनच्या पुढील बाजूस 5MP सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT