Iphone 13
Iphone 13 Sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : आयफोन १३ स्वागत नहीं करोगे हमारा?

ऋषिराज तायडे

भन्नाट फीचर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गॅजेट्स आपल्यापर्यंत आणणाऱ्या ॲपलने मंगळवारी एकाहून एक सरस उत्पादने सादर केली. बहुप्रतिक्षित ‘आयफोन १३’ मालिकेसह ‘आयपॅड’, ‘आयपॅड मिनी’, ‘ॲपल वॉच सीरिज ७’ आदी देखण्या आणि तितक्याच नवतांत्रिक गॅजेट्स लॉन्च झाली. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी ॲपलची ही नवी गॅजेट्स सादर केली. या सर्व गॅजेट्समध्ये नेमके कोणते नवे फीचर्स आणि तंत्रज्ञान दिले आहेत, त्यावर थोडक्यात नजर....

किमान स्टोरेजमध्ये दुप्पट वाढ.

आतापर्यंत आयफोनमध्ये सर्वाधिक 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळत होते. ते आता दुपटीने वाढवून 128 जीबी करण्यात आले आहे. ‘आयफोन 13’ मालिकेतील सर्व मोबाईल ही किमान 128 जीबी स्टोरेजसह उपलब्ध झाली आहे. ‘आयफोन 13’, ‘आयफोन 13 मिनी’ हे 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी; तर ‘आयफोन 13 प्रो’ आणि ‘आयफोन 13 प्रो मॅक्स’ 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी स्टोरेजसह सादर झाले आहे.

A15 Bionic Processor

‘आयफोन 13’ मालिकेतील सर्व मोबाईलमध्ये समान प्रोसेसर दिलंय, ते म्हणजे A15 Bionic. ॲपलने केलेल्या दाव्यानुसार, A15 Bionic हे ‘आयफोन 12’मधील A14 Bionic च्या तुलनेत अत्याधुनिक, वेगवान आणि पॉवर इफिशिअऩ्ट आहे. तसेच स्पर्धेतील अन्य प्रोसेसरच्या तुलनेत A15 Bionic हे 50 टक्के वेगवान असल्याचेही ॲपलने म्हटले आहे.

प्रो मोशन डिस्प्ले

‘आयफोन 13’ मालिकेतील मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये ॲपलने अनेक बदल केलेत. त्यातील महत्त्वाची बाब म्हणचे प्रोमोशन सुविधा. विशेषतः ‘आयफोन 13 प्रो’ आणि ‘आयफोन 13 प्रो मॅक्स’मध्ये दिलेल्या प्रो मोशन डिस्प्लेमुळे गरजेनुसार डिस्प्लेचा रिफ्रेश रेट बदलतो. गेमिंगवेळी सर्वाधिक 120Hz, तर इतर सामान्य वेळी 60Hz पर्यंत दिला जातो.

कॅमेरा सेटअप

ॲपलने ‘आयफोन 13’ मालिकेतील मोबाईलच्या कॅमेरामध्ये अनेक बदल केले असून काही रचनेतही थोडे बदल करण्यात आले आहेत. ‘आयफोन 13’, ‘आयफोन 13 मिनी’मध्ये ड्युअल कॅमेऱ्यासह वाईड आणि अल्ट्रा वाईड; तर ‘आयफोन 13 प्रो’ आणि ‘आयफोन 13 प्रो मॅक्स’मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह वाईड, अल्ट्रावाईड आणि टेलिफोटो फीचर्स दिले आहे.

पाच रंगात उपलब्ध

‘आयफोन 13’ मालिकेतील सर्व चारही मोबाईल पाच वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ‘आयफोन 13’, ‘आयफोन 13 मिनी’ हे गुलाबी, निळा, मिडनाईट, स्टारलाईट आणि लाल रंगात; तर ‘आयफोन 13 प्रो’ आणि ‘आयफोन 13 प्रो मॅक्स’ हे ग्राफाईट, गोल्ड, सिल्व्हर आणि सिएरा ब्ल्यू रंगात दाखल झाले आहे.

२० टक्के अधिक बॅटरी

‘आयफोन 12’च्या तुलनेत ‘आयफोन 13’मध्ये अधिक बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. ‘आयफोन 13 प्रो मॅक्स’मध्ये 20 टक्के, तर ‘आयफोन 13’च्या तर मोबाईलमध्ये जवळपास 10 टक्के अधिक बॅटरी क्षमता दिली आहे.

घुसखोरी रोखणारे तंत्रज्ञान

ॲपलने इमर्जन्सी सॉफ्टवेअर अपडेट प्रसिद्ध करत त्यांच्या उत्पादनांमधील कमतरता दूर केली आहे. या अपडेटमध्ये ‘पेगॅसस’लाही रोखण्याची क्षमता असल्याने यापुढे आयफोन, आयपॅड किंवा मॅक कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी करणे शक्य होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

आयपॅड, आयपॅड मिनी आणि ॲपल वॉच सिरिज ७

आयपॅड

  • 10.2 इंच ट्रु टोन डिस्प्ले

  • A13 Bionic प्रोसेसर

  • १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंटरस्टेज सपोर्टसह.

  • ६४ जीबी स्टोरेज क्षमता.

  • किंमत : ३२९ डॉलर

आयपॅड मिनी

  • ८.३ इंच लिक्विड रेटीना डिस्प्ले

  • A15 Bionic प्रोसेसर

  • 2nd Generation ॲपल पेन्सिल सपोर्ट

  • ४० टक्के अधिक वेगवान

  • यूएसबी-सी, ५ जी.

  • पर्पल, पिंक आणि स्टारलाइट रंगांमध्ये उपलब्ध

  • १२ मेगापिक्सल रिअर आणि फ्रंट कॅमेरा

  • किंमत : ४९९ डॉलर

ॲपल वॉच सिरिज ७

  • मोठी स्क्रिनसह कर्व्हड डिस्प्ले

  • क्रॅक, वॉटर, डस्ट रेझिस्टंट

  • दिवसभर चालणारी बॅटरी

  • वेगवान चार्जिंग

  • पाच रंगांमध्ये उपलब्ध

  • स्क्रिनवर संपूर्ण किबोर्ड

  • किंमत : ३९९ डॉलर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT