पूर्वीच्या काळातले लोक घराला कुलूप लावून जात नव्हते. याचं कारण असं होतं की त्याकाळी आपण विश्वास ठेवू असे लोक जवळपास होते. त्या काळातही चोऱ्या-दरोडे अशा घटना व्हायच्या पण त्याचे प्रमाण कमी होते. अनेक वाटसरूंना लुटून त्यांच्याकडून पैसे घेऊन असे दरोडे व्हायचे. पण आत्ताच्या काळात प्रत्येक गल्लीत एखादी तरी चोरीची घटना घडलेली पहायला मिळते.
सध्या चोरीचे क्षेत्र अगदी ऍडव्हान्स झाले आहे. लोक चालता चालता मोबाईल हिसकावून घेतात. तर, महिलांच्या गळ्यातील चैन मंगळसूत्र तर चोरांसाठीच बनवलं गेलंय असं वाटतं. कारण हे प्रकार अचानक वाढले आहेत. अशातच घरात असलेल्या महिलांना देखील सुरक्षेची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक घरात, कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत.
जेव्हा घराच्या सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा सेफ्टी डोअर, हायटेक, पासवर्ड असलेले कुलूप यांचा विचार केला जातो. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सुद्धा विचार केला जातो. कारण घरात कोण येतं कोण जातं तसेच आपल्या माघारी कोण आपल्यासाठी धोकादायक ठरू शकत हे सुद्धा कॅमेरा दिसू शकतं. त्यामुळे लोक सिसीटीव्ही कॅमेऱ्याचा विचार करू लागले आहेत.
वाढलेल्या चोरीच्या प्रकरणांमुळे तुम्हीही जर सीसीटीव्हीबसवण्याचा विचार करत असाल. तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी हे पाहूयात.
कॅमेऱ्याची गुणवत्ता
आजकाल बाजारात एकापेक्षा एक सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यामुळेच घराबाहेर सीसीटीव्ही बसवण्याआधी परफेक्ट कॅमेऱ्याची निवड करणे गरजेचे आहे. यात तुम्ही बुलेट कॅमेरा, डोम कॅमेरा, पिटीजेड कॅमेरा यांची निवड करू शकता. हे कॅमेरे घरात पासून बऱ्याच अंतरावरील दृश्य टिपू शकतात.
कॅमेऱ्याचे स्टोरेज लक्षात घ्या
जसे मोबाईलमध्ये स्टोरेज असते तसे आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला सुद्धा असते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा घेताना त्याची स्टोरेज किती आहे हे लक्षात घ्या. कारण आजकाल सीसीटीव्ही कॅमेरे कमी स्टोरेजचे आले आहेत. जे कॅमेरा स्वस्तात मिळतात म्हणून लोक घेतात. पण नंतर त्याचे स्टोरेज पटकन भरते. त्यामुळे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विचार करताना चांगल्या स्टोरेजचा कॅमेरा विकत घ्या.
कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग कॉलिटी
जसे मोबाईल घेताना त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सल आहे हे आपण पाहतो. ते आपल्या सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सुद्धा चेक करा. कारण सीसीटीव्ही कॅमेरा किती अंतरावरील स्पष्ट दिसू शकते आणि कॅमेरात टिपू शकतो हे महत्त्वाचे असते. नाहीतर एखाद्या वेळी चोरी केल्यानंतर चोराचा चेहराच नीट दिसला नाही तर अशावेळी आपली फसगत होऊ शकते.
डे आणि नाईटसाठी योग्य आहेत का
सीसीटीव्ही कॅमेरा निवडताना तो दिवस आणि रात्र या दोन्हीसाठी योग्य आहे का हे तपासा. कारण कमी किमतीत मिळतात म्हणून लोक असे कॅमेरे निवडतात जे फक्त दिवसाचे चित्र कॅप्चर करू शकतात. पण खरंतर चोऱ्या दरोडे या घटना रात्रीच्या वेळी घडतात. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी चांगली निवडा की प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट दिसली पाहिजे.
कॅमेरा मोबाईलला कनेक्ट होतो का
पूर्वी कॅमेरा कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला कनेक्टेड असायचा. प्रत्येक वेळी काय सुरू हे पाहण्यासाठी लॅपटॉप सुरू ठेवावे लागायचा. पण आता हायटेक कॅमेरे आले आहेत. जे तुमच्या स्मार्टफोनला सहज कनेक्ट होतात. त्यामुळे तुम्हाला प्रवासात किंवा इतर कुठल्याही महत्त्वाच्या कामात असताना सुद्धा घरावरती नजर ठेवता येईल.
इतर गोष्टींची घ्या काळजी
तुम्ही कॅमेरा कुठे बसवणार आहात त्याची जागा योग्य निवडा
तुमचा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे का आहे तपासा
तुम्ही कॅमेरा निवडताना एखाद्या सिक्युरिटी एक्सपर्टचे मत घेऊ शकता
आजकाल कॅमेरे हॅक सुद्धा होतात त्यामुळे तुम्ही योग्य ती सिक्युरिटी सिस्टीम त्यामध्ये फीड करा
कॅमेरात व्हिडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थित होत असेल तर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येईल त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे हे तपासा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.