online shopping 
विज्ञान-तंत्र

ऑनलाइन खरेदी करताय? फसवणूक टाळायची असेल तर बातमी नक्की वाचा

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विषेशतः कोरोनाकाळात लोकांनी मोठ्या प्रमाणात वस्तू ऑनलाईन खरेदी केल्याच्या दिसत आहेत. ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पर्याय भेटत असतात. तसेच योग्य किंमतीतही त्या वस्तू भेटत असतात. परंतु ऑनलाइन खरेदी करणे जितके सोपे आहे तितकेच ते धोकादायकही आहे.  बर्‍याच वेळा ऑनलाइन शॉपिंग दरम्यान लोकांना फसवणूकीचा सामना करावा लागतो. यामुळे ऑनलाईन खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत.

खरेदीसाठी अधिकृत वेबसाइट वापरा-
ऑनलाईन खरेदी करताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे नेहमीच अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅप वापरावं. मूळ वेबसाइटवर आपल्याला सुरक्षेसह उत्कृष्ट उत्पादनांचे पर्याय भेटत असतात. तसेच तिथं तुम्हाला कोणती वस्तू आवडली नसेल तर ती माघारी करण्यास सोपं जातं.

डेबिट कार्ड तपशील सेव्ह करु नये-
ऑनलाइन पैसे देताना वापरलेल्या डेबीट किंवा क्रेडिट कार्डाचे तपशील द्यावे लागतात. परंतु एक बाब लक्षात घेण्यासारखी म्हणजे ऑनलाईन पेमेंट करताना तपशीलाबद्दल सेव क्लिक करू नका. म्हणजेच आपले कार्ड सेव्ह करू नका.

वेबसाइटची URL चेक करा-
हॅकर्स बनावट वेबसाइट्स आणि मोबाइल अ‍ॅप्सद्वारे आपला डेटा हॅक करू शकतात. या प्रकरणात, ऑनलाइन खरेदी करताना वेबसाइटवरील लिंक तपासली पाहिजे. कारण बनावट वेबसाइटवर बर्‍याचदा एकच अक्षर बदलले असते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT