Intuitive Machines IM-1 Mission
Intuitive Machines IM-1 Mission Esakal
विज्ञान-तंत्र

Intuitive Machines IM-1 Mission: 52 वर्षांनंतर अमेरिका चंद्रावर उतरवणार अवकाशयान, पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीने पाठवले मून लँडर

अंकिता खाणे (Ankita Khane)

Intuitive Machines IM-1 Mission: तब्बल 52 वर्षांनंतर अमेरीका चंद्रावर अवकाशयान उतरवणार आहे. अर्धशतकानंतर अमेरिका आपलं अंतराळ यान चंद्रावर उतरवणार आहे. अमेरीका एका खासगी कंपनीचे मून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवत आहे. ते स्पेसएक्स रॉकेटद्वारे प्रक्षेपण केले जात आहे. हे लँडर Intuitive Machines कंपनीने बनवले आहे. त्याचे नाव ओडिसियस लँडर (Odysseus Lander) असे आहे. (Latest Marathi News)

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा 52 वर्षांनंतर म्हणजेच 1972 नंतर प्रथमच आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवणार आहे. या मून लँडरचे नाव ओडिसियस आहे. इन्ट्युटिव्ह मशिन्स (IM) नावाच्या कंपनीने ते बनवले आहे. याला IM-1 मून लँडर असेही म्हटले जात आहे. हे प्रक्षेपण 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होते परंतु तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे.

हे लॉन्चिंग फ्लोरिडामधील एका सेंटरमधून केले जाणार आहे. ओडिसियस लँडरला अवकाशात सोडण्यासाठी SpaceX च्या Falcon 9 rocketचा वापर करण्यात आला आहे. या मोहिमेला Intuitive Machines Nova-C Spacecraft असं नाव देण्यात आलं आहे. मोहिम यशस्वी झाल्यास ओडिसियस लँडर हे २२ फेब्रुवारी २०२४ ला चंद्रावर उतरेल.

या मोहिमेसाठी NASA ने IM सोबत 118 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 979.52 कोटींहून अधिक किमतीचा करार केला होता. यानंतर आयएमने ओडिसियस मून लँडर तयार केले. हे लँडर नासाच्या कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आले आहे. केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 39B वरून प्रक्षेपण केले जाईल. (Marathi Tajya Batmya)

22 फेब्रुवारी रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होईल

या मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी SpaceX कडे या आठवड्यात केवळ तीन दिवसांची लॉन्च विंडो होती. 14 फेब्रुवारीला लाँचची विंडो इंधनामुळे खराब झाली होती. हे लँडिंग यशस्वी झाल्यास, हे लँडर 22 फेब्रुवारीला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. याआधी जानेवारीतही लॉन्च करण्याची तयारी होती पण खराब हवामानामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.

पहिले खाजगी चंद्र लँडर (IM-1 Odysseus) ओडिसियस लँडर

हे एकूण 16 दिवसांचे मिशन आहे. म्हणजेच Nova-C Odysseus लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर 7 दिवस काम करेल. हे जगातील पहिले खाजगी कंपनीचे लँडर आहे, जे चंद्रावर उतरणार आहे. कारण याआधी अमेरिकन एजन्सी नासाने 1972 मध्ये अपोलो 17 मध्ये शेवटचे चंद्र लँडिंग केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

SCROLL FOR NEXT