elone musk
elone musk sakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Internet Service: भारतात लवकरच होणार स्टारलिंकची एंट्री, इलाॅन मस्कच्या दौऱ्यात होऊ शकते घोषणा

सकाळ डिजिटल टीम

टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क एप्रिलमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते भारतात इलेक्ट्रिक वाहनांसंबंधित अनेक योजनांची घोषणा करु शकतात. तसेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकची सुद्धा घोषणा करु शकतात.

भारतीय वापरकर्त्यांना इलाॅन मस्क यांच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकची प्रतिक्षा होती. आता भारतीयांची प्रतिक्षा संपणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. स्टारलिंकला दूरसंचार मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे, त्यामुळे स्टारलिंकची आता भारतात एंट्री होवू शकते. स्टारलिंकची फाइल कम्युनिकेशन मिनिस्टर अश्विन वैष्णव यांच्याजवळ आहे. ते गृह मंत्रालयातून सुरक्षेशी संबंधीत काही मुद्द्यांवर आधारित अंतिम मान्यतेची वाट पाहत आहेत.

माध्यमांतील वृत्तानूसार, जेव्हा स्टारलिंकला सर्व प्रकारच्या मान्यता मिळतील, तेव्हा स्टारलिंकला भारतात सेवा देण्यासाठी ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन सॅटेलाईट सेवेचा परवाना मिळेल. स्टारलिंकच्या नेट वर्थ आणि परदेशी गुंतवणूक यासारख्या व्यावसायिक भागांची चाचणी करण्यात आली आहे. स्टारलिंक हे ऍप्लिकेशन गाइडलाइन्सनुसार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

कंपनीने मालकी हक्काची घोषणा केली सादर

लायसन्सच्या अटींनुसार आवश्वक असलेल्या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या आहेत. याशिवाय कंपनीने मालकी हक्काची घोषणा सुद्धा सादर केली आहे. मालकीमध्ये सरकारला हे सुनिच्छित करायचे आहे की, स्टारलिंक भारताशेजारच्या कोणत्याही देशात नसावा. याशिवाय मंत्रालयाने भारतीय वापरकर्त्यांची केवायसी डिटेल आणि ग्राहकाची माहिती देशातून बाहेर जावू नये, हे सुद्धा बंधणकारक केले आहे.

त्यासोबतच सरकारला ही हमी हवी आहे की, भारतीय हवाई आणि पाण्याच्या जागेचे ट्राफिक फक्त लोकल गेटवेवरच संपायला हवे. तसेच सॅटेलाईटमधून डेटा फक्त भारतातच यायला हवा. कंपनीने यावर तोडगा काढण्याचे आश्वासन सुद्धा अधिकाऱ्यांना दिले आहे.

सध्या स्टारलिंक हे अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. स्टारलिंक हे अमेरिका, कॅनडा, यूके, फ्रान्स, नेदरलॅंड, डेनमार्क, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Latest Marathi News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीलचे 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

SCROLL FOR NEXT