samsung galaxy a33 5g galaxy a53 5g and galaxy a73 5g spotted on bis
samsung galaxy a33 5g galaxy a53 5g and galaxy a73 5g spotted on bis  
विज्ञान-तंत्र

फोन खरेदीचा विचार करताय? येतायत Samsung चे तीन 5G फोन

सकाळ डिजिटल टीम

सॅमसंग (Samsung) सध्या आपल्या Galaxy A सीरीजचे तीन नवीन स्मार्टफोन Galaxy A33, Galaxy A53 आणि Galaxy A73 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी, Galaxy A33 आणि A53 BIS म्हणजेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर स्पॉट झाले होते. आता आगामी Galaxy A73 देखील या सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे कंपनीने Galaxy A53 आणि A33 चे सपोर्ट पेज लाईव्ह केले आहे. मात्र, लाईव्ह झालेल्या सपोर्ट पेजवर या स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी लवकरच हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात लॉंच करेल.

माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या सपोर्ट पेजवर मॉडेल क्रमांक SM-A336E/DS सह Galaxy A33 5G आणि मॉडेल क्रमांक SM-A53E/DS सह Galaxy A53 5G लिस्ट केले आहेत. Galaxy A73 चे सपोर्ट पेज अजून लाइव्ह व्हायचे आहे. येत्या काही दिवसांत त्याचे सपोर्ट पेज नक्कीच लाइव्ह होईल असे बोलले जात आहे. नवीन स्मार्टफोन्समध्ये कंपनी 108 मेगापिक्सल्सपर्यंतच्या प्रायमरी कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देऊ शकते.

Galaxy A33 5G, A53 5G मध्ये अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

कंपनी Galaxy A33 5G मध्ये 6.4-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देऊ शकते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये एलईडी फ्लॅशचे 4 रियर कॅमेरे पाहायला मिळतील. यामध्ये, 48-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 5-मेगापिक्सल मॅक्रो आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज देखील असू शकतो आणि तुम्हाला 25W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी मिळू शकते.

दुसरीकडे, तुम्हाला Galaxy A53 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा सुपर AMOLED फुल एचडी + डिस्प्ले मिळू शकतो. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये Exynos 1200 चिपसेट देऊ शकते. फोटोग्राफीसाठी, कंपनी फोनच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2.5-मेगापिक्सेल कॅमेरा देऊ शकते. त्याच वेळी, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. हा फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या 5000mAh बॅटरीसह देखील येऊ शकतो.

Galaxy A73 मध्ये अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये कंपनी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा पंच-होल डिस्प्ले देऊ शकते. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला फोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा पाहायला मिळेल. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येईल. प्रोसेसर म्हणून, यात Snapdragon 750G मिळण्याची शक्यता आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT