वापरलेला iPhone खरेदी करताय? तो अस्सल आहे का कसे ओळखाल? जाणून घ्या | Used iPhone Buying Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buying a used second hand apple iPhone know how to check whether it is original and its condition

वापरलेला iPhone खरेदी करताय? तो अस्सल आहे का कसे ओळखाल? जाणून घ्या

आयफोन (iPhone) खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हे अनेकांसाठी ते एक स्टेटस सिम्बॉल आहे तसेच त्याच्या किमती जास्त असल्याने प्रत्येकाला ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण Apple चे जुने मॉडेल नवीन फोन लॉंच झाल्यावर स्वस्त मिळतात, ज्यामुळे अधिक लोकांना ते विकत घेणे शक्य होते. जसे की, जेव्हा iPhone 13 बाजारात लॉन्च झाला, तेव्हा iPhone 11 सीरीजच्या किमती कमी झाल्या. पण तुम्हाला आणखी स्वस्तात आयफोन हवा असेल तर, तुम्हाला सेकंड हॅंड iPhone वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाकडून तो खरेदी करु शकता. परंतु प्रत्येक गॅजेट खरेदी करताना जशी कळजी घेणे आवश्यक असते, तशीच काही गोष्टींची काळजी वापरलेला iPhone खरेदी करण्यापूर्वी घेतली पाहिजे.

आयफोन ओरिजनल आहे का?

तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून खरेदी करत असलेला आयफोन खरा आहे की नाही हे पाहणे नेहमीच महत्त्वाचे असते. तुम्‍हाला खरेदी करण्‍याच्‍या आयफोनचा सिरीअल नंबर विचारा. “https://checkcoverage.apple.com/” वर Apple च्या चेक कव्हरेज वेबसाइटवर जा आणि तुमच्या Apple आयडीने साइन इन करा. तुमच्याकडे कोणतेही Apple डिव्हाइस नसले तरीही तुम्ही Apple ID तयार करू शकता. लॉग इन केल्यानंतर, खरेदीची वैध तारीख, वॉरंटी तपशील आणि टेक्निकल सपोर्ट डिटेल्स तपासण्यासाठी सिरियल नंबर एटर करा. जर आयफोन चोरीला गेला नसेल आणि मॉडेल अस्सल असेल, तर वेबसाइट सर्व तपशील दिसेल. जर तुम्हाला कोणतेही डिटेल सापडले नाहीत, तर तो फोन खरेदी करू नका. तसेच, तुम्ही प्रत्यक्षपणे iPhone तपासत असताना तुम्हाला iPhone च्या सेटिंग्ज मेनूमध्ये तोच सिरियल नंबर दिसत आहे का? हे व्हेरिफाय करा.

हेही वाचा: वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

आपण आयफोन खरेदी करण्यापूर्वी, मागील मालकाने डिव्हाइसमधून सर्व डेटा काढला असल्याची खात्री करा. तसेच, मागील मालकाने iPhone वर FindMy सर्व्हिस बंद केली आहे आणि फॅक्टरी रीसेट योग्यरित्या केले आहे, याची खात्री करा. तुम्ही सेटिंग्ज - जनरल - रीसेट - Erase All Content and Settings वर जाऊन हे काढून टाकू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड डिटेल्स आणि Apple आयडीसह आयफोन वापरणे सुरू करू शकता. तसेच, आयफोनच्या मालकाने iCloud वरून डिव्हाइस काढून टाकल्याची देखील खात्री करा.

आयफोनचे सर्व पेपर्स आहेत का?

वापरलेला आयफोन खरेदी करताना पहिल्या मालकाकडे असलेली सर्व बिले, पावत्या आणि त्यांनी खरेदी केलेल्या प्रॉडक्टविषयी इतर तपशील व्यवस्थित पाहून घ्या. तुम्ही त्या व्यक्तीकडून खरेदी करत असलेल्या आयफोनसोबत सर्व कागदपत्रे सोबत येत असल्याची खात्री करा. बर्‍याच प्रकरणांमध्ये, Apple बिलिंगमध्ये डिव्हाइसची मालकी बदलण्याची परवानगी देत ​​​​नाही, परंतु तरीही तुम्ही काही बदल करु शकता आणि iPhone यूजर तुम्ही असल्याचे निश्चित करु शकता.

हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

iPhone मध्ये सर्व इन-बॉक्स अॅक्सेसरीज आहेत?

तसेच आयफोनचे सर्व इन-बॉक्स पार्ट डिव्हाइसमध्ये आहेत की नाही हे देखील खरेदीदारांनी तपासले पाहिजे. यामध्ये मुळात आयफोन केबल, इयरपॉड्स (वायर्ड इयरफोन) आणि चार्जिंग अॅडॉप्टर यांचा समावेश होतो. सिम इजेक्टर पिन देखील आहे का ते तुम्ही त्या व्यक्तीला विचारू शकता. तसेच, चार्जिंग केबल व्यवस्थित तपासा.

वापरलेल्या iPhone ची कंडीशन तपासावी लागेल. त्या व्यक्तीने फोन कसा ठेवला किंवा हाताळला याबद्दल आपल्याला माहिती नसते. म्हणून, आयफोनमध्ये काही लक्षात येण्याजोगे डेंट्स, स्क्रॅच आहेत किंवा कॅमेरा लेन्स व्यवस्थित आहे का ते तपासा. तसेच, बटणे आणि डिस्प्ले व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा.

Apple हा एक ब्रँड आहे, जो जुन्या मॉडेल्सना लेटेस्ट सॉफ्टवेअर ऑफर केले जाते आणि iOS 11.3 सह लोक आयफोन मॉडेलची बॅटरी हेल्थ तपासू शकतात. तुम्ही सेटिंग्जमध्ये गेल्यास, बॅटरी हेल्थ इंडिकेटर तुम्हाला युनिटची स्थिती सांगतो. जर बॅटरी हेल्थ खूप खरा अशेल तर, तर iPhone खरेदी करणे टाळवे. सहसा, 88% ते 90% पेक्षा कमी बॅटरी हेल्थ असलेले जुने iPhone खरेदी करणे टाळा.

हेही वाचा: ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km

Web Title: Buying A Used Second Hand Apple Iphone Know How To Check Whether It Is Original And Its Condition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..