whatsupp news  esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp hack : तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोण वाचतंय ? असे करा चेक !

तुमचा फोन घेऊन दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन केले तर तुमचे संदेश सहजपणे वाचले जावू शकतात

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सध्या अनेक मॅसेंजर ॲप सोशल मिडीया प्लॅटफॉर्म उपलब्ध असूनही व्हॉट्सॲपची (WhatsApp) क्रेझ काही कमी झालेली नाही. ऑफिस असो वा खाजगी आयुष्य सर्वच गोष्टींसाठी व्हॉट्सॲप वापरले जाते. यात अनेकांची सिक्रेट असतात. तूमचे सिक्रेट जर कोणी वाचत असेल तर?, किंवा ते वापरून तूम्हाला कोणी ब्लॅकमेल करेल अशी भिती वाटत असेल. असे प्रकार अनेक लोकांसोबत घडले आहेत. तुमच्यासोबतही असे घडू नये यासाठी व्हॉट्सॲपमध्ये काही सेटींग करून हे प्रकार थांबवता येतात.

तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोण वाचू शकतो

व्हॉट्सॲपवेब (Whatsup Web) आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट (multi device support) यासारख्या व्हॉट्सॲप फीचर्सचे नावे तुम्ही ऐकली असतील. तुम्ही त्याचा वापरही करत असाल. या ॲपच्या मदतीने, तुम्ही एकाच वेळी दोनपेक्षा अधिक डिव्हाइसवर (Device) एकच व्हॉट्सॲप वापरू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन घेऊन दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन केले तर तो तुमचे संदेश सहजपणे वाचू शकेल. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर काही सेटींग्स करू शकता. ज्यामुळे तुमचे मॅसेज प्रायव्हेट राहतील.

हे सेटिंग करा?

एखाद्याने तूमच्या व्हॉट्सॲपवर लॉगइन केले होता का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला लिंक्ड डिव्हाइस (Linked Device) चा पर्याय मिळेल.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तूमचे व्हॉट्सॲप कोण कोणत्या डिव्हाइसला लॉग-इन केले आहे याचे डिटेल्स मिळतील. जर ऑनलाईन नसूनही तूमचे व्हॉट्सॲप लॉग इन दिसत असेल.तर,तूम्ही त्यातून लॉग आउट होऊ शकता.

लक्षात ठेवा

ऑफिस डेस्कला व्हॉट्सॲप कनेक्ट केले असेल तर ऑफिसमधून निघताना ते बंद करायला विसरू नका. तसेच, जर चुकून व्हॉट्सॲप लॉग आउट करायचे राहिले असेल तर मोबाईलवरून ते लॉग आउट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT