नवी दिल्ली : WhatsApp हे चॅटींगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे ऍप आहे. आपले मित्र मंडळी, कुटुंबातील नातेवाईक, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड या साऱ्यांसोबतच्या आपल्या गप्पा आणि गुजगोष्टी या WhatsApp वरच होत असतात. WhatsApp द्वारेच अनेक लोक आपल्या खाजगी गोष्टी एकमेकांना शेअर करत असतात. हे खाजगी चॅट चुकून देखील कुणीही वाचू नये, अशीच सगळ्यांची इच्छा असते. आपल्या गैरहजरीत आपल्या मोबाईलमधील हे खाजगी चॅट कुणी वाचलं तर? ही भीती आपल्याला सतत सतावत असतेच. पण आता ही भीती नाहक ठरणार आहे. कारण आम्ही तुम्हाला आता अशी एक क्लृप्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ही फुकाची भीती नष्ट होऊन जाणार आहे. या क्लृप्तीद्वारे तुम्ही कायमचे सुरक्षित होऊन जाल. तुमच्या WhatsAppवरील एखाद्या विशिष्ट चॅटला आता लॉक लावता येणार आहे.
यासाठी काय करावं लागेल?
यासाठी WhatsApp Chat Locker या नावाचे ऍप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. या अॅपमध्ये पासवर्ड टाकून तुम्ही कोणत्याही एका किंवा अधिक लोकांच्या चॅट्सना लॉक करू शकता. हे अॅप कसे काम करतं ते जाणून घ्या...
एकाच WhatsApp चॅटला लॉक कसे करावे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.