Igatpuri
Igatpuri 
टूरिझम

वीकएण्ड पर्यटन : निसर्गसंपन्न इगतपुरी

सकाळवृत्तसेवा

आपल्याला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हटल्यावर एकच नाव डोळ्यांसमोर येते ते महाबळेश्वर; परंतु नाशिक जिल्ह्यातीत इगतपुरी हेसुद्धा थंड हवेचे ठिकाण हा पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. धबधब्यांचे गाव, आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र; तसेच भाताचे कोठार म्हणून इगतपुरीची राज्यभर ओळख आहे. याबरोबरच तालुक्यात अनेक गड-किल्ले आहेत, ऐतिहासिक वारसा आहे, आध्यत्मिक केंद्र आहेत. एवढेच नव्हे, तर निसर्गाची विपुलता या तालुक्याला लाभली आहे. इगतपुरीची समुद्रसपाटीपासूनची उंची १ हजार ९०० फूट आहे. इगतपुरीजवळच असणाऱ्या कसारा घाट व परिसर हा पावसाळयात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर ठरत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, वाशी, मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात.

सिंहस्थ पर्वकाळातील शाहीस्नानासाठी प्रसिद्ध असलेले कावनई, रामायणकालीन किष्किंधा नगरी, सर्वतीर्थ टाकेदचे रामायणकालीन जटायू मंदिर याच भागात आहेत. इगतपुरीत मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण (२६ किलोमीटर), सुंदरनारायण गणेश मंदिर (देवबांध - ३५ कि.मी) अशोका धबधबा (१२ किलोमीटर) याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा; तसेच सांधन दरी या ठिकाणपासून जवळच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे अशी सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके आणि रेल्वेचे बोगदे, ब्रिटिशकालीन पूल अनुभवणे हा तर एक रोमांचकारी अनुभव असतो. इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे. बौद्ध धर्मातील विपश्यना या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात. घोटी या गावाजवळून कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत. घोटी येथील तांदूळ, मुरमुरे, रानभाज्यांसह सर्व प्रकारच्या भाजीपाला मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. इगतपुरीजवळच धनुष्यतीर्थ धबधबा पाहण्यासारखा आहे. कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत. 

निसर्गाचे वरदान लाभलेले इगतपुरी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT