kolhapur tourism news Spend an evening with your partner at a resort near Delhi 
टूरिझम

दिल्लीपासून जवळच आहेत चार अतिशय सुंदर रिसॉर्ट; आपल्या जोडीदारासोबत घालवा एक सायंकाळ

धनाजी सुर्वे

कोल्हापूर : अलिकडे धकाधकीच्या जीवणात आपल्या जोडीदारासोबत काही क्षण घालवायचे म्हटले तर त्यासाठी अतिशय कसरत करावी लागते. यातूनही वेळ काढून जोडीदाराला घेऊन बाहेर गेलाच तर तुम्हाला तसे ठिकाणही मिळायला पाहिजे. जेथे तुम्ही आणि तुमचा जोडीदार, बस्स तिसरा कोणी नकोच. अशीत काही सुंदर ठिकाणे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणी घालविलेले क्षण तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही.  दिल्लीपासून अगदी थोड्याशाच अंतरावर अशी काही रिसाॅर्ट आहेत. याठिकाणी तुम्ही एकदा तरी जाऊन यालेच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या रिसाॅर्टबद्दल.  
 
हेरिटेज विलेज रिसाॅर्ट आणि स्पा मानेसर

हेरिटेज विलेज हे रिसाॅर्ट राजस्थानच्या हबेली फॅशनमध्ये बनविले आहे. हे रिसाॅर्ट दिल्ली- जयपूर हायवेवर गुडगाव जवळील मानेसरमध्ये आहे. दिल्लीपासून ४३ किलोमिटर अंतरावर हे रिसाॅर्ट असून दिल्ली विमानतळापासून येथे पोहोचण्यासाठी केवळ दिहा मिनिटे लागतात. येथे तुम्हाला भारतीय आणि विदेशी स्टाईलचे मिश्रण पाहायला मिळेल. येथे वेळ घालविण्यासाठी तुम्हाला एका रात्रीसाठी पाच हजार रूपये मोजावे लागतील. 
  
कॅम्प वाईल्ड ध्वज फरीदाबाद

दिल्लीजवळील फरीदाबाद येथील कॅम्प ध्वज मांगर गावाजवळ आहे. दिल्ली आणि गुडगावच्या जवळ असल्याने विकेंडसाठी हे ठिकान प्रसिध्द आहे. रोजज्या कंटाळवाण्या जगण्यातून चांगला वेळ घालविण्यासाठी अरावलीच्या डोंगरामधील कॅम्प वाईल्ड ध्वजला जाण्याचे नियोजन कराच. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एडवेंचर खेळांचाही आनंद  घेता येईल. या ठिकाणी तुम्हाला सहा हजार रूपये खर्च करावे लागतील. 

सुरजीवन रिसाॅर्ट मेवात

हे रिसाॅर्ट दिल्ली-जयपूर हायवे एनएच-८ वर गुडगांवजवळ मेवात जिल्ह्यात आहे. दिल्लापासून २९ किलोमीटरवर हे रिसाॅ्र्ट आहे. या रिसाॅर्टचा सेटअप गावासारखा आहे. मातीच्या भिंती आणि छप्पराचे छत असलेल्या या रिसाॅर्टकडे बस पाहातच राहवे असे वाटते. एका दिवसासाठी येथे पाच हजार रूपये खर्च आहे.

बोटॅनिक्स नेचर रिजॉर्ट सोहना

दिल्लीपासून ५१ किलोमीटर अंतरावर सोहनाजवळच्या दमदमालेकच्या किनारी हे रिसाॅर्ट आहे. थोडेसे महाग असले तरी येथे घालविलेला वेळ तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या जोडीदारासोबत येथे वेळ घालविण्यासाठी तुम्हाला सात हजार रूपये मोजावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT